घरताज्या घडामोडीमहाराष्ट्राने CNG भाव कमी केला परंतु केंद्राने वाढवून अडथळा आणला, नाना पटोलेंची...

महाराष्ट्राने CNG भाव कमी केला परंतु केंद्राने वाढवून अडथळा आणला, नाना पटोलेंची केंद्रावर टीका

Subscribe

राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये इंधन दरवाढीवरुन वाद सुरु आहे. राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं आहे. तसा त्यांनी टोलाच मुख्यमंत्र्यांना लगावला होता. राज्य सरकारने सीएनजी १३ टक्क्यांवरुन ३ टक्क्यांवर आणला होता परंतु केंद्र सरकारने सीएनजीच्या दरात वाढ केली आहे. यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र सरकारने सीएनजीचे भाव कमी केले असताना केंद्र सरकारने त्यात वाढ केली आहे. यामुळे नागरिकांना दिलेल्या दिलाशात अडथळा आणला असे नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र सरकारने सीएनजीवरील वॅट १३.५ टक्क्यांवरुन घटवून ३ टक्क्यांवर आणला. पण केंद्रातील भाजप सरकारने याच काळात सीएनजीच्या दरात ३० रुपयांनी वाढ करुन जनतेला मिळणाऱ्या दिलाशाच्या मार्गात अडथळा आणला अशा आशयाचे ट्विट नाना पटोले यांनी करुन केंद्र सरकारवर टीका केली आहे.

- Advertisement -

तसेच नाना पटोले पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने महागड्या पेट्रोलियम उत्पादनांवरुन राज्य सरकारांवर खापर फोडण्याऐवजी आत्मचिंतन करावे. राहुल गांधी नोटाबंदी, चुकीचा जीएसटी, चीन आणि बेरोजगारीच्या मुद्यांवर राहुल गांधींचे भाष्य खरे ठरले. महागाई आणि ढासळत्या अर्थव्यवस्थेविषयीची त्यांची भीती अगदी रास्त आहे. आर्थिक आघाडीवरील अपयश झाकण्यासाठी भाजप आता धर्माच्या आड लपण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

- Advertisement -

महाविकास आघाडी सरकारने सीएनजीच्या दर १३ टक्क्यांवरुन ३ टक्क्यांची घट केली होती. यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला होता. परंतु केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे. नैसर्गिक वायूच्या किंमतीमध्ये केंद्र सरकारने ११० टक्क्यांची वाढ केली आहे. तर महानगर गॅस लिमिटेड कंपनीकडून सीएनजीमध्ये ४ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत सीएनजीचा दर ७६ रुपयांवर गेला आहे. यावरुन नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.


हेही वाचा : मराठीनंतर हिंदुत्वाचा खेळ सुरु करुन अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं राज ठाकरेंवर टीकास्त्र

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -