घरक्रीडाWomen's T20 Challenge: 'या' मैदानात होणार महिला टी-20 चॅलेंज स्पर्धा, बीसीसीआय सचिव...

Women’s T20 Challenge: ‘या’ मैदानात होणार महिला टी-20 चॅलेंज स्पर्धा, बीसीसीआय सचिव जय शाहांची घोषणा

Subscribe

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी आयपीएल 2022 च्या प्लेऑफ आणि अंतिम वेळापत्रकाची घोषणा केली. यासोबतच बीसीसीआयने महिलांचे टी-२० चॅलेंज स्पर्धाही आयोजित केली जाणार असल्याची घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी केली.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी आयपीएल 2022 च्या प्लेऑफ आणि अंतिम वेळापत्रकाची घोषणा केली. यासोबतच बीसीसीआयने महिलांचे टी-२० चॅलेंज स्पर्धाही आयोजित केली जाणार असल्याची घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी केली. या स्पर्धेचा अंतिम सामाना २८ मे रोजी खेळवला जाणार असल्याचेही जय शाह यांनी सांगितलं.

कोरोना महामारीमुळं महिला टी 20 चॅलेंज स्पर्धा ही खेळवण्यात आली नव्हती. मात्र आता या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. महिला टी-20 चॅलेंज स्पर्धा येत्या 23 मे ते 28 मे दरम्यान पुण्यात खेळवण्यात येणार असल्याची घोषणा जय शाह यांनी केली आहे.

- Advertisement -

“महिला टी-२० चॅलेंज स्पर्धा दोन वर्षानंतर खेळवली जाणार आहे. यंदा पुण्याला या स्पर्धेचं यजमानपद देण्यात आलं आहे. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सर्व सामने खेळले जाणार आहे. पहिला सामना 23 मे, दुसरा सामना 24 मे आणि तिसरा सामना 26 मे ला खेळवला जाणार आहे. त्यानंतर अंतिम सामना 28 मे रोजी होणार आहे.”, असं जय शाहा यांनी म्हटलं.

महिला टी 20 चॅलेंज स्पर्धेत ट्रेलब्लेझर्स, सुपरनोव्हास आणि व्हेलोसिटी नावानं तीन संघ मैदानात उतरणार आहे. सुपरनोव्हासनं 2018 आणि 2019 मध्ये विजेतेपद पटकावले होतं. तर, 2020 मध्ये ट्रेलब्लेझर्सचा संघ प्रथमच चॅम्पियन बनला.

- Advertisement -

बीसीसीआयनं याआधी महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेचं आयोजन उत्तर प्रदेशच्या क्रिकेट असोसिएशनला मिळणार असल्याची घोषणा केली होती. तसेच हे सर्व सामने ट्रेलब्लेजर्स, सुपरनोवाज आणि व्हेलॉसिटीमधील लखनऊमध्ये खेळवले जातील, असंही सांगितलं होतं. मात्र, बीसीसीआयनं आपल्या निर्णयात बदल केला असून हे सर्व सामने पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळले जाणार असल्याची घोषणा केली आहे.


हेही वाचा – IPL 2022: आयपीएलमध्ये ‘या’ खेळाडूने मारला 117 मीटर लांब सर्वात मोठा षटकार

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -