घरताज्या घडामोडीकॅनडा मधून अमेरिकेत घुसखोरी करणाऱ्या 6 भारतीयांना सीमेवर अटक

कॅनडा मधून अमेरिकेत घुसखोरी करणाऱ्या 6 भारतीयांना सीमेवर अटक

Subscribe

कॅनडातून बेकायदेशीरपणे अमेरिकेत दाखल झालेल्या सहा भारतीय नागरिकांना अमेरिकेच्या सीमेवर अटक करण्यात आली आहे. अमेरिकेच्या सीमेवर तैनात असलेल्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

कॅनडातून बेकायदेशीरपणे अमेरिकेत दाखल झालेल्या सहा भारतीय नागरिकांना अमेरिकेच्या सीमेवर अटक करण्यात आली आहे. अमेरिकेच्या सीमेवर तैनात असलेल्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. यूएस कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शनने दिलेल्या माहितीनुसार, मसेना सीमेवरून एकूण सात जणांना अटक करण्यात आली. यूएस सीमेवर गस्त घालणाऱ्या एजंट्सच्या मदतीने सेंट रेजिस मोहॉक आदिवासी पोलीस विभाग, अक्वेस्ने मोहॉक पोलीस सर्व्हिस आणि हॉगन्सबर्ग-अक्वेस्ने स्वयंसेवक अग्निशमन विभागाने त्यांना अटक केली आहे.

यूएस सीमेवर अटक करण्यात आलेले 6 ही भारतीय नागरिक हे 19 ते 21 वयोगटातील आहेत. सर्वांवर अमेरिकन कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. त्यावेळी, सातवा तरुण हा अमेरिकेचा नागरिक असून, त्याच्यावर मानवी तस्करीत सहभागी असल्याचा आरोप आहे. दोषी आढळल्यास या लोकांना दंडासह 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

या संदर्भात गेल्या आठवड्यात अक्वेस्ने मोहॉक पोलीस सेवेला कळवण्यात आले होते की, ज्याने सेंट रेजिस मोहॉक पोलिसांना एका बोटीची माहिती दिली होती जी ओंटारियो, कॅनडातून युनायटेड स्टेट्सकडे निघाली होती. या बोटीत अनेक लोक सामील होते. सेंट रेजिस मोहॉक पोलिसांनी थोड्यावेळाने पाहिले असता त्यांना एक बोट पाण्यात बुडताना दिसली. यानंतर बुडणारी बोट पाण्यातून बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, बुडणाऱ्या बोटीवर एकही लाईफ जॅकेट किंवा सुरक्षा उपकरण नव्हते. बर्फाळ पाण्यामुळे बोटीवर तैनात असलेल्या लोकांची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. पाण्यातून बाहेर काढल्यानंतर सातही जणांवर उपचार करून त्यांना बॉर्डर पेट्रोलिंग स्टेशनमध्ये नेण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा – अमित शाह सौरव गांगुलीची डिनर डिप्लोमसी, दादा भाजपमध्ये जाणार

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -