घरताज्या घडामोडीराणा दाम्पत्याला आत टाकण्याची सुपारी संजय पांडेंनी घेतली होती का?, किरीट सोमय्यांचा...

राणा दाम्पत्याला आत टाकण्याची सुपारी संजय पांडेंनी घेतली होती का?, किरीट सोमय्यांचा सवाल

Subscribe

मागील काही दिवसांपासून मनसुख हिरेन हत्या प्रकरण हे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तर दुसरीकडे राणा दम्पत्यांची तुरुंगातून सुटका झाली असून आमदार रवी राणा दिल्लीला जाणार असल्याचे म्हटलं जात आहे. तसेच राजद्रोहाचा गुन्हा दाखल होण्याबाबत अनेक सवाल भाजप नेते किरीट सोमय्यांनी उपस्थित केले आहेत. अशातच किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. राणा दाम्पत्याला आत टाकण्याची सुपारी संजय पांडेंनी घेतली होती का?, असा सवाल किरीट सोमय्यांनी उपस्थित केला आहे.

राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल होऊच शकत नाही. आता ज्याने हा गुन्हा लावला त्यावर कारवाई होणार ना?, त्यामुळे संजय पांडे आणि दिलीप वळसे पाटील यांनी आता उत्तर द्यावे. नवनीत आणि रवी यांना आत टाकण्याची सुपारी संजय पांडे यांनी घेतली होती का? नगराळे यांची बदली का केली गेली?, असे अनेक प्रश्न सोमय्या यांनी उपस्थित केले.

- Advertisement -

मनसुख हिरेन यांचं कुटुंब आता थोड स्थिरावलं आहे. त्यांच्याशी मी चर्चा केली. मनसुख हिरेन वसुलीखोर असल्याचे चित्र ठाकरे सरकारने तयार केले होते, त्यामुळे हिरेन कुटुंबाला अडचणींचा सामना करावा लागला होता. दरम्यान, वाझेंना आणि प्रदीप शर्मा यांना पुन्हा पोलीस दलात आणणाऱ्यांची चौकशी केली पाहिजे, असं सोमय्या म्हणाले.

गेली अनेक वर्षे माफिया सेना या ठाणे महापालिकेत सत्तेत आहे. अनेक वर्ष घोटाळे झाले. मात्र, गेल्या पाच वर्षात जे घोटाळे झाले, त्याची एक काळी पुस्तिका भाजपा काढणार आहे. मुंबईप्रमाणे ठाण्यात देखील पोलखोल सभा होणार असून ५० प्रकारचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचा इशारा सोमय्यांनी दिलाय.

- Advertisement -

हेही वाचा : राज ठाकरेंची सरकारला भीती वाटते; काँग्रेस नेते संजय निरुपम यांचा ‘मविआ’वर आरोप


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -