घरदेश-विदेशकेंद्राची मोठी घोषणा, देशात ई - जनगणना होणार

केंद्राची मोठी घोषणा, देशात ई – जनगणना होणार

Subscribe

आपण आतापर्यंत जनगणना अतिशय हलक्यात घेतली आहे. येत्या काळात जी काही जनगणना होईल ती ई-जनगणना असेल.  पुढील 25 वर्षांसाठी ही जनगणनाअसेल. सर्वप्रथम मी स्वत: याची सुरुवात करणार आहे

देशात पुढील जनगणना ई – जनगणना होणार आहे. कोरोनाची लाट कमी होताच देशात ई – जनगणना सुरू होईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. ई – जनगणनेचे काम 2024 पूर्वी पूर्ण केले जाईल, असेही अमित शाह यांनी सांगितले.

गृहमंत्री अमित शहा यांनी गुवाहाटी येथे देशात प्रथमच होणाऱ्या ई-जनगणनेच्या पहिल्या इमारतीचे सोमवारी उद्घाटन केले. यावेळी ते म्हणाले की, दिल्लीतील राष्ट्रीय लोकसंख्या इमारतीचे बांधकाम यावर्षी ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल. हाय-टेक, त्रुटी-मुक्त, बहुउद्देशीय जनगणना अॅप जन्म, मृत्यू, कौटुंबिक आर्थिक स्थिती इत्यादी सर्व वैयक्तिक माहिती अपडेट करण्यास सक्षम असेल. त्यामुळे सर्वसामान्यांना शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. यातून मिळालेल्या अनेक प्रकारच्या माहितीचा फायदा भावी सरकारांना मिळेल, जेणेकरून ते आपली धोरणे आणि अनेक लोकांसाठी काम करू शकतील.

- Advertisement -

आपण आतापर्यंत जनगणना अतिशय हलक्यात घेतली आहे. येत्या काळात जी काही जनगणना होईल ती ई-जनगणना असेल.  पुढील 25 वर्षांसाठी ही जनगणनाअसेल. सर्वप्रथम मी स्वत: याची सुरुवात करणार आहे. मी माझ्या कुटुंबाची संपूर्ण माहिती सॉफ्टवेअरमध्ये टाकेन. यामध्ये जन्म-मृत्यू नोंदणीचीही व्यवस्था केली आहे, असेही शहा यांनी सांगितले. ही जनगणना  संपूर्ण देशासाठी महत्त्वाची असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, आसामसाठी ते खूप महत्त्वाचे आहे. काय नियोजन करावे लागेल हे जनगणनाच सांगू शकते. राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनाही याच आधारावर तयार केल्या जातात. अचूक जनगणनेच्या आधारे 2047 मध्ये भारत स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करेल तेव्हा देश प्रत्येक क्षेत्रात पुढे असेल.  देशात अनेक त्रुटींची चर्चा केली जाते. पाणी नाही, रस्ता नाही. प्रत्येकजण उणिवांवर चर्चा करतो, परंतु ते कसे दूर करावे हे कोणीही सांगत नाही. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी जनगणना आवश्यक आहे. यावरून कुठे विकासाची गरज आहे हे कळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -