घरमुंबईमनसेचे संदीप देशपांडे, संतोष धुरी यांच्या अडचणीत वाढ, जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर

मनसेचे संदीप देशपांडे, संतोष धुरी यांच्या अडचणीत वाढ, जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थवर मशिदींवरील भोंग्.ांविरोधात 4 मे रोजी झालेल्या आंदोलनात देशपांडे आणि धुरी यांनी पोलिसांना चकवा देत कारमधून पळ काढला होता. तेव्हापासून ते दोघे फरार होते.

फरार असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. त्यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जावरील सुनावणी लांबणीवर गेली आहे. न्यायाधीश उपस्थित नसल्याने जामीन अर्जावरील सुनावणी मंगळवारी पूर्ण झाली नाही. ही सुनावणी आता १७ मे रोजी होणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थवर मशिदींवरील भोंग्.ांविरोधात 4 मे रोजी झालेल्या आंदोलनात देशपांडे आणि धुरी यांनी पोलिसांना चकवा देत कारमधून पळ काढला होता. तेव्हापासून ते दोघे फरार होते. यावेळी महिला पोलीस कर्मचारी जमिनीवर पडून जखमी झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी पोलिसांनी संदीप देशपांडे, संतोष धुरी, दादर शाखाप्रमुख संतोष साळी आणि कारचा ड्रायव्हर यांच्या विरोधात कलम ३०८, ३५३, २७९ आणि ३३६ अन्वये गुन्हा दाखल केला. ड्रायव्हरला आणि संतोष साळी यांना अटक करण्यात आली होती.

- Advertisement -

घटनेच्या दिवसापासून संदीप देशपांडे, संतोष धुरी फरार होते. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून 7 पथके तयार करण्यात आली.  मुंबई पोलिसांच्या 4 टीम आणि मुंबई क्राईम ब्राँचच्या 3 टीम दोघांचा मुंबई, पनवेल, नवी मुंबई, उरण, खोपोली या ठिकाणी शोध घेत आहे. या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी अटकपूर्व जामिनासाठी सोमवारी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली. मात्र, मंगळवारी सुनावणी न झाल्याने दोघांना कधीही अटक होऊ शकते. आता १७ मे रोजी होणाऱ्या सुनावणीदरम्यान कोर्टाकडून नेमका काय निर्णय दिला जातो, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -