घरताज्या घडामोडीशिवसेनेच्या सभेत राज ठाकरेंच्या सभेची दृश्य, मनसेचा आरोप

शिवसेनेच्या सभेत राज ठाकरेंच्या सभेची दृश्य, मनसेचा आरोप

Subscribe

ते फोटो आणि व्हिडीओ हे उद्धव ठाकरे यांच्या सभेचे नसून राज ठाकरेंच्या सभेचे असल्याचा दावा मनसे नेते गजानन काळे यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची १४ मे ला सभा होणार  आहे. या सभेचे टीझर शिवसेनेने प्रसिद्ध केले . मात्र यातील फोटो आणि व्हिडीओ हे उद्धव ठाकरे यांच्या सभेचे नसून राज ठाकरेंच्या शिवतीर्थावरील सभेचे असल्याचा दावा मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी केला आहे. काळे यांनी टि्वटरवर ते फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहे.

- Advertisement -

शिवसेनेने मनसेचे नेतेही चोरले आणि आता फोटो, व्हिडीओही चोरत असल्याचा आरोप काळे यांनी केला आहे. तसेच असली नकलीअसली नकली म्हणणाऱ्यांनी स्वतः चे आत्मपरीक्षण करा..काहीतरी अस्सल तुमचे असुद्या.
इतके ही नकली होऊ नका.
सभा शिवसेनेची आणि व्हिडिओ मध्ये गर्दी मनसेच्या सभेची…अजून माणसं जमा करायला राजसाहेबांचाच आधार घ्यावा लागतो का ..? लक्षात आल्यावर ट्विट डिलिट करण्याची नामुष्की…नकली हिंदुत्ववादी असे टिव्वट करत काळे यांनी शिवसेनेच्या सभेला गर्दी असल्याचे दाखवण्यासाठी राज ठाकरेंचा आधार घ्यावा लागतो का असा सवाल केला आहे. यावर शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -