घरक्रीडा'चेन्नई'चा सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या 'या' विक्रमाने सचिन तेंडुलकरलाही टाकले मागे

‘चेन्नई’चा सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या ‘या’ विक्रमाने सचिन तेंडुलकरलाही टाकले मागे

Subscribe

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15 व्या पर्वातील चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या सामना खुपच रोमांचक झाला.

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15 व्या पर्वातील चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या सामना खुपच रोमांचक झाला. या सामन्यात चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाढ याने तुफानी खेळी केली. या खेळीसह त्याने एक अनोखा विक्रम रचत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही मागे टाकलं आहे.

सलामीवीर ऋतुराज गायकवाडने अनोखा विक्रम रचला. या सामन्यात त्याने आयपीएलमध्ये 35 डावांत 1205 धावा केल्या. या धावांसह त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. 35 डावांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये ऋतुराज अव्वल स्थानी आहे. सचिनने आयपीएलमध्ये 35 धावांत 1170 धावा केल्या होत्या.

- Advertisement -

या सामन्यात नाणेफेक जिंकत चेन्नई सुपर किंग्ज संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला. सुरूवातीला फलंदाजी करताना सलामीवर ऋतुराज गायकवाडच्या अर्धशतकी धावांची खेळी केली. ऋतुराजने 49 चेंडूंमध्ये एक षटकार आणि चार चौकार लगावत 53 धावा केल्या. तसेच चेन्नईच्या मोईन अली आणि एन जगदीशन या जोडीनेही चांगली फलंदाजी केली. या दोंघांनी अनुक्रमे 21 आणि 39 धावा केल्या. ज्यामुळे संघाला 133 धावांपर्यंत मजल मारता आली.

यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघाला उत्तम कामगिरी करता आली नाही. या पर्वात चेन्नईला सर्वाधिक सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे प्ले ऑफच्या शर्यतीला मुकावे लागले.

- Advertisement -

हेही वाचा – IPL 2022 : आयपीएलमधील दिल्ली वि. पंजाबचा सामना होणार निर्णायक, कोणाच्याही विजयामुळे बंगळुरूचं टेन्शन वाढणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -