घरताज्या घडामोडीगुगलचा मोठा निर्णय; प्ले स्टोअरवरून 9 लाख अॅप काढणार

गुगलचा मोठा निर्णय; प्ले स्टोअरवरून 9 लाख अॅप काढणार

Subscribe

गुगल प्ले स्टोअरवरून तब्बल 9 लाख अॅप काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे आता तमुच्य मोबाईलमधील काही अॅप्सही आता डिलीट होऊ शकतात.

गुगल प्ले स्टोअरवरून तब्बल 9 लाख अॅप काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे आता तमुच्य मोबाईलमधील काही अॅप्सही आता डिलीट होऊ शकतात. अँड्रॉइड अथॉरिटीच्या रिपोर्टनुसार, प्ले स्टोअरवरून अॅप काढून टाकल्यास गुगल अ‍ॅप स्टोरवरील अ‍ॅप्सची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होईल. गुगल आणि अॅपलने अशा अॅप्सची यादी तयार केली आहे.

युजर्सची सुरक्षा लक्षात घेऊन गुगलने मोठा निर्णय घेतला आहे. गुगल कंपनीनं सुमारे 9 लाख अ‍ॅप्स हटवण्याची योजना बनवली आहे. त्यानुसार, ज्यांचे अपडेट जारी केले जात नाहीत, ते अॅप्स आता प्ले स्टोअर्सवरून डिलीट करण्यात येणार आहेत. त्यामुळे हे अ‍ॅप्स युजर्सना डाउनलोड करता येणार नाहीत. हे अ‍ॅप्स नव्या एपीआय आणि पद्धतीचा वापर करत नाहीत, म्हणून हे जास्त सुरक्षित नाहीत.

- Advertisement -

गुगलच्या नवीन प्ले स्टोअर पॉलिसीनुसार, थर्ड पार्टी अ‍ॅप्सना कॉल रेकॉर्डिंगची परवानगी मागता येणार नाही. त्यामुळे ट्रू-कॉलर, ऑटोमॅटिक कॉल रेकॉर्डर, क्यूब एसीआर आणि अन्य अनेक लोकप्रिय अ‍ॅप बंद होऊ शकतात. परंतु ज्या अॅन्ड्रॉईड फोनच्या डायलरमध्ये डिफॉल्ट कॉल रेकॉर्डिंग सुविधा आहे, त्या फोन्समधून कॉल रेकॉर्ड करता येतील.


हेही वाचा – International Day of Families 2021: कुटुंबाचे महत्त्व सांगणारा आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस का साजरा केला जातो?

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -