घरमनोरंजन'ठग्स ऑफ हिंदुस्तान'वर झालेल्या टीकेमुळे शाहरुख नाराज

‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’वर झालेल्या टीकेमुळे शाहरुख नाराज

Subscribe

बीग बजेट चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' हा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला असून त्याच्या निगेटीव्ह कमेंट्सवर बॉलीवूडचा किंग शाहरुख खान नाराज झाला आहे.

बॉलीवूडचे दोन सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि आमिर खान, यशराज फिल्म्सच्या बॅनरचा बीग बजेट चित्रपट ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ हा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला आहे. इतकेच नव्हे तर त्यावर नेटीझन्सने मिम्स बनवत निगेटीव्ह कमेंट्स देखील दिले आहेत. मात्र आता या निगेटीव्ह कमेंट्सवर बॉलीवूडचा किंग शाहरुख खान नाराज झाला आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. मात्र प्रत्यक्षात त्यांचा अपेक्षा भंग झाला आहे. याबाबत शाहरुख खानला विचारले असता त्याने यावर दुःख व्यक्त केले आहे.

वाचा :‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ प्रदर्शनाच्या काही तासातच लीक

- Advertisement -

काय म्हणाला शाहरुख खान

ठग्ज ऑफ हिंदुस्तानला मिळालेल्या प्रतिक्रियेबाबत मला काही बोलायचे आहे. मला माहिती नाही की मला हे बोलायला हवा का नाही. जे काही झालयं ते ऐकून मी खुपच दुःखी झालो आहे. जेव्हा माझ्या चित्रपटांच्याबाबत हे झालं, तेव्हा मला इतकं दुःख झालं नाही. मात्र यावेळी मी दुःखी झालो आहे. कित्येक कलाकार आहेत, ज्यांनी या चित्रपटाला खुप काही दिले आहे. एखादा चित्रपट वाईट किंवा चांगला असू शकतो. आमच्यापैकी कोणीही असं सांगू शकत नाही, की आम्ही जगातील सर्वात चांगली फिल्म बनवली आहे. मिस्टर बच्चन आणि आमिर खानने या चित्रपटात त्यांचे महत्त्वाचे योगदान दिले आहे. जर त्यांचा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षेला फोल ठरला असेल, तर तुम्ही आजवरच्या त्यांच्या सिनेसृष्टीतील योगदानाला कसे विसरू शकता. मला वाटत की काही जण जरा जास्त कठोर होत आहेत. हे सर्व कलाकार आणखी जास्त कामातून पुन्हा तुमच्या समोर येतील, असे शाहरुख खान म्हणाला.

वाचा : बॉलिवूडच्या ठग्सवर ‘मीम्स’चा पाऊस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -