घरमुंबईपत्री पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेवर रविवारी विशेष ब्लॉक

पत्री पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेवर रविवारी विशेष ब्लॉक

Subscribe

कल्याणमधील जुना पत्री पूल पाडण्यासाठी येत्या रविवारी मध्य रेल्वेवर सहा तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.

गेल्या ३ महिन्यांपासून वाहतुकीसाठी बंद असलेला कल्याणमधील जुना पत्री पूल पाडण्याच्या कामाला अखेर मुहूर्त सापडला आहे. हा पूल पाडण्यासाठी येत्या रविवारी मध्य रेल्वेवर सहा तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार असून त्यामुळे अनेक लोकल्स, मेल आणि एक्सप्रेसचे वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे. वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक ठरलेला पत्री पूल गेल्या ३ महिन्यांपासून ‘जैसे थे’ अवस्थेत होता. हा पूल पाडून या ठिकाणी नवीन पूल उभारण्यात येणार आहे.

वाचा :‘राम मंदिर नंतर बांधा, आधी पत्री पूल बांधा’

- Advertisement -

मनसेच्या आंदोलनानंतर कामाला गती

तीन महिने उलटूनही या पुलाचे काम अत्यंत धिम्यागतीने सुरू होते. मात्र काही दिवसांपूर्वी मनसेने केलेल्या आंदोलनानंतर या पुलाच्या कामाला गती आलेली दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या रविवार, १८ नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वेने सहा तासांचा विशेष ब्लॉक जाहीर केला आहे. रविवारी सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० पर्यंत हा विशेष ब्लॉक घेतला जाणार असून त्या कालावधीत या पुलाचा लोखंडी सांगाडा (स्ट्रक्चर) काढण्याचे प्रस्तावित आहे.

वाचा : अखेर कल्याणचा धोकादायक पत्री पूल पाडण्यास सुरुवात

- Advertisement -

विशेष ब्लॉकचा वाहतुकीवर परिणाम

या सहा तासांच्या विशेष ब्लॉकचा परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर होणार असून अनेक लोकल्स, मेल आणि एक्स्प्रेसचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे. तर या कालावधीत सीऐसएमटी ते डोंबिवली आणि कर्जत कसारा ते कल्याण या मार्गावर लोकलसेवा सुरू राहणार आहे. त्यामुळे या पुढील प्रवासासाठी लोकांना पर्यायी रस्ते वाहतुकीचा अवलंब करावा लागणार आहे.

वाचा : धोकादायक पत्री पूल २४ ऑगस्टला पाडण्यात येणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -