घरताज्या घडामोडीसंजय राऊतांविरोधात १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल, किरीट सोमय्यांचा घणाघात

संजय राऊतांविरोधात १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल, किरीट सोमय्यांचा घणाघात

Subscribe

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. संजय राऊत आणि ठाकरे सरकारला माफी मागावी लागेल असा इशारा किरीट सोमय्या यांनी केला आहे. दादागिरी आणि दहशत निर्माण करण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न सुरु आहे. या सगळ्या पापाचे फळ त्यांना मिळणार असल्याचा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.

माजी खासदार किरीट सोमय्या म्हणाले की, वास्तविकरित्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत म्हणजे यांनी माफी कशी मागावी याची तयारी सुरु केली पाहिजे. १०० कोटींचा दावा मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केला आहे. आता कितीची पेनल्टी आणि दंड व्हावा हे न्यायालय ठरवेल यातील एकही पैसा आम्हाला नको आहे. सर्व पैसे धर्मदाय संस्थेला द्यावेत परंतु महाराष्ट्रातील जनतेला संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माफी पाहिजे आहे. कारण ज्या प्रकारे दहशत सुरु आहे. नेव्ही ऑफिसरच्या घरी जाऊन मारणे, जीवे मारण्याचे काम करणं म्हणून उद्धव ठाकरेंना एकदा तरी धडा शिकवायचा होता. १०० कोटींचा शौचालय घोटाळा आता कळेल ही स्वस्त प्रसिद्धी घेताना आपण महाराष्ट्रातील नागरिकांची मानहानी आणि दहशत उभा करण्याचा प्रयत्न करत असेल तर या पापाचे फळ तुम्हाला मिळेल असे सोमय्या म्हणाले आहेत.

- Advertisement -

वकील अमित मेहता यांनी राऊतांविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. अमित मेहता आणि कंपनी कोर्टात मेंशन करणार आहे. जून महिन्यात सुनावणी सुरु होईल अशी माहिती सोमय्यांनी दिली आहे.

- Advertisement -

सोमय्यांवर शौचालय घोटाळ्याचा आरोप

युवक प्रतिष्ठानच्या संचालिका मेधा सोमय्या यांनी सार्वजनिक शौचालयांची कंत्राटे मिळवून तब्बल १६ ठिकाणी अशी बांधकामे केली. त्यांनी मीरा-भाईंदर महापालिका अधिकार्‍यांची फसवणूक करून खोटी कागदपत्रे सादर करून शौचालयांची ३ कोटी ९० ५२ रुपयांची बिलेसुद्धा घेतली, अशी तक्रार करण्यात आली होती. विधिमंडळाच्या अधिवेशनात गृहराज्यमंत्री यांनी मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त व आर्थिक गुन्हे शाखा मुंबई यांना चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी १८ मार्च २०२१ रोजी शासनाकडे अहवाल सादर केला आहे. त्या अहवालानुसार १६ ठिकाणी युवक प्रतिष्ठानने कांदळवन तसेच सीआरझेड व बफर झोन क्षेत्रात शौचालयांची बांधकामे केली असल्याचे स्पष्ट नमूद केले आहे.


हेही वाचा : कोणीही असो शिवसेना अपक्षाला पाठिंबा देणार नाही, संभाजीराजेंच्या उमेदवारीवर राऊतांचे स्पष्ट वक्तव्य

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -