घरताज्या घडामोडीअमेरिकेतील ओक्लाहोमा येथे गोळीबार; 1 ठार, 7 जखमी

अमेरिकेतील ओक्लाहोमा येथे गोळीबार; 1 ठार, 7 जखमी

Subscribe

अमेरिकेमध्ये (America) पुन्हा एकदा गोळीबार (shooting) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ओक्लाहोमामध्ये (Oklahoma) मेमोरियल डे उत्सवाच्या (memorial day festival) मैदानात हा गोळीबार झाला असल्याचे समजते.

अमेरिकेमध्ये (America) पुन्हा एकदा गोळीबार (shooting) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ओक्लाहोमामध्ये (Oklahoma) मेमोरियल डे उत्सवाच्या (memorial day festival) मैदानात हा गोळीबार झाला असल्याचे समजते. रविवारी गोळीबार झाला असून, यामध्ये 1 ठार आणि 7 जण जखमी झाले आहेत. या गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी याप्रकरणी एका 26 वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

यूएस मीडियाच्या वृत्तानुसार, ओक्लाहोमामध्ये मेमोरियल डे उत्सवाच्या (memorial day festival) मैदानात गोळीबार झाला. या गोळीबारानंतर जखमींवर जवळच्या रुग्णालयात (Hospital) उपचार सुरू आहेत. तसेच, ओक्लाहोमामध्ये मेमोरियल डे उत्सवात सुमारे 1,500 लोक सहभागी झाले होते.

- Advertisement -

हेही वाचा – New York Subway Shooting : अमेरिका बॉम्बस्फोटाने हादरली; न्यूयॉर्कमधील मेट्रो स्थानकावर गोळीबार, 5 ठार

ओक्लाहोमा स्टेट ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने यांनी याबाबत सांगताना स्पष्ट केले की, गोळीबाराच्या या घटनेत एका 39 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तसेच, इतरांची प्रकृती गंभीर आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या स्कायलर बकनरसाठी अटक वॉरंट जारी करण्यात आले होते आणि त्याने रविवारी दुपारी मस्कोगी काउंटी शेरीफच्या कार्यालयात स्वतःला हजर केले.

- Advertisement -

एका अहवालानुसार, यापूर्वी अमेरिकेत झालेल्या गोळीबाराच्या विविध घटनांमध्ये 17000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये 640 मुलांचा समावेश आहे.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील टेक्सास येथील शाळेत गोळीबार (Firing In School) करण्यात आला होता. ‘रॉब एलिमेंट्री स्कूल’ असे गोळीबार झालेल्या शाळेचं नाव असून हल्लेखोर तरुण याच शाळेचा माजी विद्यार्थी होता. या गोळीबारात 18 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून तीन शिक्षकांनीही आपले प्राण गमावले होते. तसेच पोलिसांनी प्रत्युत्तरात दाखल केलेल्या कारवाईत 18 वर्षीय हल्लेखोर तरुण ठार झाला.


हेही वाचा – Putin’s Secret : व्लादिमीर पुतीन यांचा मृत्यू झाल्याचा ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेचा दावा, रशियाच्या सत्तेवर हुबेहूब दिसणारी व्यक्ती

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -