घरमनोरंजनIIFA 2022 मध्ये Vicky Kaushal च्या 'सरदार उधम'चा बोलबाला; सर्वाधिक पुरस्कार मिळवून...

IIFA 2022 मध्ये Vicky Kaushal च्या ‘सरदार उधम’चा बोलबाला; सर्वाधिक पुरस्कार मिळवून मारली बाजी

Subscribe

अबुधाबी येथे पार पडलेल्या IIFA 2022 च्या पुरस्कार सोहळ्यात अभिनेता विकी कौशलच्या ‘सरदार उधम’ चित्रपटाने ‘IIFA रॉक्स 2022’ महोत्सवात सर्वोत्कृष्ट छायांकन आणि संपादनासह तांत्रिक श्रेणींमध्ये तीन पुरस्कार जिंकले आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील तांत्रिक प्रतिभेचा गौरव करणारा वार्षिक कार्यक्रम अबुधाबीच्या यास बेटावरील इतिहाद एरिना येथे आयोजित करण्यात आला होता.

  • ‘सरदार उधम’ ने पटकावले 3 पुरस्कार
    शूजीत सरकार यांनी दिग्दर्शित केलेला ‘सरदाम उधम’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संपादन आणि सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्टसाठी तसेच सर्वोत्कृष्ट छायांकनसाठी 3 पुरस्कार पटकावले.
  • ‘अतरंगी रे’ चित्रपटाने पटकावले 2 पुरस्कार

- Advertisement -

दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या ‘अतरंगी रे’ चित्रपटाला या चित्रपटातील ‘चका चक’ या गाण्यातील नृत्यासाठी विजय गांगुली यांना सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. तसेच एआर रहमानला सर्वोस्कृष्ट बॅकग्राऊंड म्यूजिकसाठी पुरस्कार मिळाला. ‘अतरंगी रे’ चित्रपटात अक्षय कुमार, धनुष आणि सारा अली खान यांनी महत्त्वाच्या भूमिका साकराल्या आहेत.

  • या चित्रपटांचा होता बोलबाला
    विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित ‘शेरशाह’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट स्क्रीनप्लेसाठी पुरस्कार मिळाला. तसेच तापसी पन्नूच्या ‘थप्पड’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट डायलॉगसाठी पुरस्कार मिळाला. अभिनेता अजय देवगणच्या ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट साउंड डिजाइन हा पुरस्कार मिळाला. तसेच रणवीर सिंहच्या ’83’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट साउंड मिक्सिंग हा पुरस्कर मिळाला.

दरम्यान, IIFA 2022 पुरस्कार सोहळा फराह खान आणि अपारशक्ति खुराना होस्ट करत आहेत. तसेच या पुरस्कार सोहळ्यात संगीतकार तनिष्क, नेहा कक्कर, हनी सिंह , गुरू रंधावा , ध्वनि भानुशाली, ज़हरा एस खान, असीस कौर आणि ऐश किंग यांनी आपल्या गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलेले आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :http://Major VS Samrat Prithviraj : ‘मेजर’ चित्रपट ‘सम्राट पृथ्वीराज’वर पडला भारी; कमावले इतके कोटी

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -