घरमहाराष्ट्रशिवसेनेशी दगाबाजी करणारे ते सहा आमदार कोण?, संजय राऊतांनी नावेच सांगितली

शिवसेनेशी दगाबाजी करणारे ते सहा आमदार कोण?, संजय राऊतांनी नावेच सांगितली

Subscribe

कोल्हापूरचे अपक्ष आमदार संजय मामा शिंदे, नांदेडचे अपक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे, अमरावतीचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार, बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर, बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर, बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील या सहा आमदारांनी ऐनवेळी मत बदलल्यानं शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचं संजय राऊतांनी सांगितलं

मुंबईः शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी शिवसेनेचे उमेदवार संजय पवारांच्या पराभवाचे खापर अपक्षांवर फोडले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना असेल, बच्चू कडूंचा पक्ष असेल, शंकरराव गडाख असतील, येड्राव्हकर असतील किंवा इतर काही मते असतील जी आम्ही चर्चा केली होती. जे पक्षाबरोबर आणि आघाडीबरोबर आहेत ती मतं सगळीच्या सगळी आम्हाला मिळालेली आहेत. फक्त घोडेबाजारात जे लोक उभे होते, त्यांची सहा ते सात मतं मिळू शकलेली नाहीत, असं संजय राऊत म्हणालेत.

सोलापूरचे अपक्ष आमदार संजय मामा शिंदे, नांदेडचे अपक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे, मोर्शीचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार, बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर, बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर, बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील या सहा आमदारांनी ऐनवेळी मत बदलल्यानं शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचं संजय राऊतांनी सांगितलं.

- Advertisement -

काही जे बाजारातले नेहमीचे घोडे असतात, ते घोडे विकले गेले. ते घोडे बाजारात होते. जास्त बोली लागली, असं मला वाटतंय. इतर काही कारणं असतील. त्यामुळेच आमची साधारण सहा एक मतं होती, अपक्षांची ती आम्हाला मिळाली नाहीत. ते कोणाचेच नसतात, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी अपक्ष आमदारांवर जोरदार हल्ला चढवलाय. प्रत्यक्ष मतदान करत असताना कोणत्याही प्रकारचं धार्मिक प्रदर्शन करायचं नसतं, अमरावतीचे शहाणे जे काही उद्योग करत होते, त्यांचं मत घटनेनुसार बाद व्हायला हवं. पण फक्त आमचं मत बाद करून पहाटे ज्या काही गोष्टी करण्यात आल्या, यांना पापकृत्य करण्याची पहाटेची फार सवय आहे, त्या उपक्रमाला आमच्या शुभेच्छा आहेत, तुम्ही असेच उपक्रम करत राहा आणि महाराष्ट्राचा एकदाचा कायमचा घोडेबाजार करून टाका, असंही संजय राऊत म्हणालेत.

शेवटी या देशातल्या केंद्रीय यंत्रणा या राजकीय पक्षांच्या सत्ताधारी पक्षांच्या दबावाखाली कशा प्रकारे काम करतात हे काल आम्ही डोळ्यांनी पाहत होतो. कुठे ईडी वापरलं जातं. कुठे सीबीआय वापरलं जातं. कुठे अशा प्रकारच्या निवडणूक यंत्रणाही वापरल्या जातात का? अशी शंका येतेय. नक्कीच आमचा एक उमेदवार विजयी होऊ शकला नाही. याचा अर्थ असा नाही कोणीतरी समोर फार मोठा देदीप्यमान विजय मिळवला. आपली एक जागा भारतीय जनता पक्षानं जिंकलीय, असंही संजय राऊतांनी सांगितलंय.

- Advertisement -

हेही वाचाः बाजारातले घोडे जास्त बोली लागल्यानं विकले गेले, संजय राऊतांचा अपक्ष आमदारांवर हल्लाबोल

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -