घरटेक-वेकइंटरनेटचा एक काळ गाजवणारे मायक्रोसॉफ्टचे 'इंटरनेट एक्सप्लोरर' अखेर बंद

इंटरनेटचा एक काळ गाजवणारे मायक्रोसॉफ्टचे ‘इंटरनेट एक्सप्लोरर’ अखेर बंद

Subscribe

ज्यांनी इंटरनेट एक्सप्लोरर वापरले ते सुद्धा हळू हळू मायक्रोसॉफ्ट एग्ज वापरू लागतील, असा विश्वास मायक्रोसॉफ्ट एग्जचे प्रोग्रॅम मॅनेजर सीन लिंडर्से यांनी व्यक्त केला आहे

इंटरनेटवर एक काळ गाजवणारे मायक्रोसॉफ्टचे इंटरनेट एक्सप्लोरर हे वेब ब्राउझर अखेर कायमचे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 27 वर्षांपासून सुरु असलेला हा ब्राऊजर ५ जून २०२२ पासून बंद होईल. मायक्रोसॉफ्टने 2016 पासून इंटरनेट एक्सप्लोरर अपडेट करणे थांबवले होते. इंटरनेट आज अब्जावधी युजर्स आहेत, मात्र इंटरनेट एक्सप्लोररचा वापर करणाऱ्या युजर्सचा टक्का अवघा 5 आहे. (Internet Explorer)

दरम्यान ९० च्या दशकात डेस्कटॉप कम्प्युटरवर इंटरनेट वापरासाठी इंटरनेट एक्सप्लोरर हे एकमेव प्रसिद्ध ऑप्शन होते. दरम्यान हे वेब ब्राउझर १९९५ मध्ये ‘विंडोज ९५’ (Windows 95) सोबत देण्यात आले. यानंतर मायक्रोसॉफ्टने प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टिममध्ये इंटरनेट एक्सप्लोरर हे ब्राउझर देण्यास सुरुवात केली. २००३ मध्ये जगातील 95 टक्के कॉम्प्युटरवर इंटरनेट एक्सप्लोरर हे वेब ब्राउझर वापरले जायचे. परंतु आता गुगल क्रोम, मॉझिला आणि इतर ब्राऊजरच्या शर्यतीत इंटरनेट एक्सप्लोरर कायमचे मागे पडले.

- Advertisement -

यानंतर मायक्रोसॉफ्टच्या प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टिमसोबत इंटरनेट एक्सप्लोरर हे ब्राउझर देण्यास सुरुवात झाली. अल्पावधीत विंडोज ही ऑपरेटिंग सिस्टिम आणि त्याच्या सोबत मिळणारे इंटरनेट एक्सप्लोरर हे ब्राउझर हे सर्वत्र दिसू लागले. डेस्कटॉप कॉम्प्युटरच्या बाजारात मायक्रोसॉफ्ट कंपनीची एकाधिकारशाही निर्माण झाल्याचे चित्र होते. उपलब्ध आकडेवारीनुसार २००३ मध्ये जगातील ९५ टक्के डेस्कटॉप कॉम्प्युटरवर इंटरनेट एक्सप्लोरर हे वेब ब्राउझर वापरले जात होते. यानंतर स्पर्धक कंपन्यांच्या नवनव्या ब्राउझरशी स्पर्धा करताना इंटरनेट एक्सप्लोरर तांत्रिक बाबतीत हळू हळू मागे पडले. डेस्कटॉप कॉम्प्युटरमध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीची ऑपरेटिंग सिस्टिम वापरत असले तरी इंटरनेट ब्राउझिंगसाठी स्पर्धक कंपन्यांचे ब्राउझर वापरणाऱ्यांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली. न

व्याने निर्माण होत असलेल्या आव्हानांना सामोरे जाणे इंटरनेट एक्सप्लोररला कठीण जात असल्याचे स्पष्ट होत गेले आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीने मायक्रोसॉफ्ट एग्ज या नव्या ब्राउझरच्या निर्मितीवर लक्ष केंद्रीत केले. टप्प्याटप्प्याने इंटरनेट एक्सप्लोरर बंद करायचे असे ठरले आणि प्रक्रिया सुरू झाली. जेव्हा इंटरनेट एक्सप्लोरर लाँच झाले तेव्हा खूप कमी जणांकडे इंटरनेच सुविधा होती. मात्र ब्राऊजरमुळे लोकांच्या समस्या दूर होण्याबरोबर काम सोप झाले. पोलिसांना रेकॉर्डसवरी गुन्हे शोधण्याबरोबर, विद्यार्थ्यांना अभ्यासिक माहितीसाठी इंटरनेट एक्सप्लोररने खूप महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे इंटरनेट एक्सप्लोररसोबत अनेकांच्या असंख्य आठवणी आहेत.

- Advertisement -

मात्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्मबरोबर इंटरनेटचा वेग वाढत गेला. सरकारी एजन्सी आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधीत कंपन्या आजही इंटरनेट एक्सप्लोररचा वापर करत होते. 16 ऑगस्ट 1995 मध्ये मायक्रोसॉफ्टने पहिल्यांदा हा ब्राऊजर लाँच केला. सायबर कॅफेमध्ये 90 च्या काळात हा ब्राऊजर सर्वाधिक वापरला जायचा.

ज्यांनी इंटरनेट एक्सप्लोरर वापरले ते सुद्धा हळू हळू मायक्रोसॉफ्ट एग्ज वापरू लागतील, असा विश्वास मायक्रोसॉफ्ट एग्जचे प्रोग्रॅम मॅनेजर सीन लिंडर्से यांनी व्यक्त केला आहे. मात्र इंटरनेट एक्सप्लोरर बंद झाले तरी मायक्रोसॉफ्ट ब्राऊजर क्षेत्रात कायम राहणार आहे. युजर्स आता मायक्रोसॉफ्ट एग्ज वापरू शकतात. यात कंपनीने वेग आणि इनबिल्ट प्रायव्हसी आणि सिक्युरिटीचा दावा केला आहे.


Reliance Jio युजर्सना झटका! हा ऑफर प्लान केला बंद; आता किती पैसे मोजावे लागणार?

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -