घरताज्या घडामोडीराहुल गांधींची ईडीकडून ३ तास चौकशी, जेवणानंतर पुन्हा होणार चौकशी

राहुल गांधींची ईडीकडून ३ तास चौकशी, जेवणानंतर पुन्हा होणार चौकशी

Subscribe

सकाळपासूनच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत ठिकठिकाणी राहुल गांधी यांचे पोस्टर लावले होते. ज्यावर लिहिले होते- हे राहुल गांधी आहेत, झुकणार नाही. देशाच्या इतर भागात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची तीन तास ईडीने चौकशी केली. ३ तासांच्या चौकशीनंतर राहुल गांधींना दुपारी जेवण्यासाठी सुट्टी दिली आहे. यानंतर राहुल गांधी थेट आपल्या निवासस्थानी जाऊन काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. दरम्यान जेवणानंतर पुन्हा एकदा राहुल गांधी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. राहुल गांधींच्या चौकशीदरम्यान काँग्रेस नेत्यांनी कार्यालयाबाहेर निदर्शने केली. यामध्ये काँग्रेसच्या बड्या नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडी चौकशी करण्यात आली. ईडीच्या चौकशीसाठी राहुल गांधी दिल्लीतल्या कार्यालयात दाखल झाले होते. त्यांना ईडीच्या चौकशीमध्ये अधिकाऱ्यांनी ५० पेक्षा जास्त प्रश्न विचार असल्याची माहिती मिळाली आहे. काँग्रेसने राहुल गांधींवरील कारवाईचा कडाडून विरोध केला होता. सकाळपासूनच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत ठिकठिकाणी राहुल गांधी यांचे पोस्टर लावले होते. ज्यावर लिहिले होते- हे राहुल गांधी आहेत, झुकणार नाही. देशाच्या इतर भागात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.

- Advertisement -

राहुल गंधींना ईडी कार्यालयात पोहचण्यासाठी ४५ मिनिट लागले

खासदार राहुल गांधी दिल्लीतील निवासस्थानाहून १०.४२ मिनिटांनी चौकशीसाठी रवाना झाले. परंतु कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर गर्दी केल्यामुळे त्यांना पोहचण्यासाठी तब्बल ४५ मिनिटांचा वेळ लागला. १०.४९ वाजता काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात पोहोचले. या ठिकाणी बड्या नेत्यांसोबत प्रियांका गांधी उपस्थित होत्या. यावेळी बैठक घेण्यात आली. यानंतर पुन्हा १०.५८ वाजता राहुल गांधी ईडीच्या कार्यालयाकडे रवाना झाले.

राहुल गांधी यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांना पोलिसांनी ईडी कार्यालयापासून १ किलोमीटरच्या अंतरावर रोखले होते. ११.२७ वाजता राहुल गांधी ईडी कार्यालयात दाखल झाले. या नंतर त्यांची चौकशी सुरु करण्यात आली. राहुल गांधींच्या समर्थनार्थ आंदोलन करताना मल्लिकार्जुन खर्गेे, जयराम रमेश, मुकुल वासनिक, दिग्विजय सिंह, दीपेंद्र हुड्डा, पवन खेड़ा, पीएल पूनिया, गौरव गोगोई, मीनाक्षी नटराजन यांसह काँग्रेसच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

- Advertisement -

हेही वाचा : काँग्रेसचं शक्तिप्रदर्शन नसून तो भाजपविरोधातील संताप….संजय राऊत

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -