घरमहाराष्ट्रमहिलांच्या भावना दुखावणारं हे कुठलं पुरोगामित्व? मेघना बोर्डीकरांचा चाकणकरांना सवाल

महिलांच्या भावना दुखावणारं हे कुठलं पुरोगामित्व? मेघना बोर्डीकरांचा चाकणकरांना सवाल

Subscribe

लग्न झाल्यापासून मी एकदाही वडाच्या झाडाला फेरे मारले नाहीत, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या होत्या.

“वडाला फेऱ्या मारणं महत्वाचं नसतं. त्यातील भावना महत्वाची आहे. आपल्या माणसासाठी कुठल्याही पातळीला जायची तयारी ठेवणं, हा त्यामागचा खरा संदेश आहे”, असं ट्विट करत आमदार मेघना बोर्डीकर (Meghana Bordikar) यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना टोला लगावला आहे. लग्न झाल्यापासून मी एकदाही वडाच्या झाडाला फेरे मारले नाहीत, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या होत्या. (What kind of progress is this that hurts women’s feelings? Meghna Bordikar’s question to the Rupali Chakankar)

हेही वाचा – सत्यवानाची सावित्री आम्हाला समजली, मात्र जोतिबांची सावित्री समजली नाही – रुपाली चाकणकर

- Advertisement -

विधवा प्रथा बंदीच्या कार्यक्रमात रुपाली चाकणकर यांनी वटपौर्णिमेविषयी भाष्य केलं होतं. वटपोर्णिमेनिमित्त अनेक महिला वडाला फेरे मारुन पुढचे सात जन्म हाच पती मिळू दे, अशी प्रार्थना करतात. पण मी लग्न झाल्यापासून एकदाही वडाला फेरे मारले नाहीत. माझ्या सासरच्या मंडळींनी देखील मला कधी आग्रह केला नाही वा माझ्या नवऱ्याने पण कधी तसा हट्ट केला नाही. याबाबत मी भाग्यवान आहे. आपल्या समाजाला सत्यवानाची सावित्री फार लवकर समजली, परंतु ज्योतिबाची सावित्री अजून समजली नाही, अशी शोकांतिका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केली होती. यावरून समाजमाध्यमातून उलट सुटल प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अशातच भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी ट्विट करुन चाकणकर यांच्या वट पोर्णिमेच्या युक्तीवादावर निशाणा साधला आहे.

हेही वाचा – पुढील 24 तासात जीवे मारु, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना धमकी

- Advertisement -

“वडाला फेऱ्या मारणं महत्वाचं नसतं. त्यातील भावना महत्वाची आहे. आपल्या माणसासाठी कुठल्याही पातळीला जायची तयारी ठेवणं, हा त्यामागचा खरा संदेश आहे. तुम्ही करत नाही. पण व्रत न करण्याचा गवगवा करून व्रत करणाऱ्या इतर महिलांच्या भावना दुखावणारं हे कुठलं पुरोगामित्व आहे?”, असा सवाल बोर्डीकरांनी चाकणकरांना केला आहे.

“वटपोर्णिमेच्या सणाचा निसर्गाशी जोडले जाण्याचा उद्देश आहे, हे तुम्ही जाणीवपूर्वक विसरण्याचे कारण काय असावे? पुरोगामीत्वाच्या नावाखाली हिंदुत्वाला खुला विरोध हा आपला जुनाच अजेंडा राहिलेला आहे. तो सुरुच ठेवा. आमच्या धर्म, संस्कृतीचे त्यामुळे काहीच बिघडणार नाही”, असंही बोर्डीकर म्हणाल्या आहेत.

 

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -