घरक्राइमअबुधाबीत नोकरी लावण्याच्या आमिषाने २० जणांची फसवणूक, तिघांविरुद्ध गुन्हा

अबुधाबीत नोकरी लावण्याच्या आमिषाने २० जणांची फसवणूक, तिघांविरुद्ध गुन्हा

Subscribe

शाईन जरीवाला ही 62 वर्षांची महिला डोंगरी येथे राहते. तीन वर्षांपूर्वी तिची तिन्ही आरोपींशी ओळख झाली होती. या तिघांनी अंधेरी येथे बुनेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी असून याच कंपनीत ते तिघेही अधिकारी, कर्मचारी आणि एजंट म्हणून काम करीत असल्याचे सांगितले होते.

अबुधाबी (Abu Dhabi) येथे नॅशनल ऑईल कंपनीत (National Oil Company) नोकरीचे (job) आमिष दाखवून 20 तरुणांची फसवणुक झाल्याचा प्रकार भायखळा (Byculla) परिसरात उघडकीस आला आहे. नोकरीसाठी घेतलेल्या 20 लाख 57 हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध भायखळा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. ऋषिकेश हरिश्चंद्र नलावडे, साई प्रितम अमीन आणि मनिष पांडे अशी या आरोपींची नावे असून गुन्हा दाखल होण्यापूर्वीच ते तिघेही पळून गेले आहेत. त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली आहे.

शाईन जरीवाला ही 62 वर्षांची महिला डोंगरी येथे राहते. तीन वर्षांपूर्वी तिची तिन्ही आरोपींशी ओळख झाली होती. या तिघांनी अंधेरी येथे बुनेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी असून याच कंपनीत ते तिघेही अधिकारी, कर्मचारी आणि एजंट म्हणून काम करीत असल्याचे सांगितले होते. ही कंपनी अनेक बेरोजगार तरुणांना दुबई, शारजा आणि आबूधाबी येथे नोकरीसाठी पाठविते असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या बतावणीला भुलून तिने तिच्या भावासह १९ जणांना अबुधाबी येथे नोकरीसाठी पाठविण्याची विनंती केली होती. त्यांनीही तिला या सर्वांना तेथील नॅशनल ऑईल कंपनीत नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून 20 लाख 57 हजार रुपये घेतले होते. मात्र तीन वर्ष उलटूनही कोणालाही नोकरीसाठी अबुधाबी येथे पाठविले नाही. सतत विचारणा करुन त्यांनी त्याला ठोस आश्वासन दिले नाही. तसेच नोकरीसाठी घेतलेले पैसेही परत केले नाहीत.

- Advertisement -

या तिघांकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच तिने भायखळा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी ऋषिकेश हरिश्चंद्र नलावडे, साई प्रितम अमीन आणि मनिष पांडे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. ते तिघेही पळून गेल्याने त्यांचा  पोलिसांकडून शोध सुरु आहे. त्यांनी अशाच प्रकारे इतर काही बेरोजगार तरुणांची फसवणुक केली असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.आरोपींच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -