घरताज्या घडामोडीवर्षा निवासस्थानावरील बैठकीत या आमदारांची उपस्थिती राहणार

वर्षा निवासस्थानावरील बैठकीत या आमदारांची उपस्थिती राहणार

Subscribe

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. एकनाथ शिंदे यांच्याजवळ शिवसेनेचे ३७ आमदार असल्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी ५ वाजता वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक घेणार आहेत. या बैठकीला शिवसेनेचे १८ आमदार तर ४ खासदार उपस्थित राहणार आहेत.

कोणते आमदार आणि खासदार बैठकीत राहणार हजर ?

सुनील प्रभू (मालाड), राजन साळवी (राजापूर), प्रकाश फातर्पेकर (चेंबूर), सुनील राऊत (विक्रोळी), वैभव नाईक (कुडाळ-मालवण), आदित्य ठाकरे (वरळी), रमेश कोरगावकर (भांडुप), कैलास पाटील (पाचोरा), नितीन देशमुख (बाळापूर), अजय चौधरी (शिवडी), राहुल पाटील (परभणी), संतोष बांगर (हिंगोली), भास्कर जाधव (गुहागर), रवींद्र वायकर (जोगेश्वरी), संजय पोतनीस (कलिना), कैलास पाटील (उस्मानाबाद), उदयसिंह राजपूत (औरंगाबाद) आणि उदय सामंत (रत्नागिरी), असे एकूण शिवसेनेचे १८ आमदार बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

तर राहुल शेवाळे (मुंबई दक्षिण मध्य), गजानन किर्तीकर (मुंबई – उत्तर पश्चिम), ओमराजे निंबाळकर (उस्मानाबाद) आणि अरविंद सावंत (दक्षिण मुंबई), असे एकूण शिवसेनेचे ४ खासदार बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

शिवसेनेचे ३७ आमदार आणि ९ अपक्ष आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटी येथील रेडिसन ब्लु हॉटेलमध्ये उपस्थित आहेत. दरम्यान, काल देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानावर शिवसेनेच्या सर्व आमदार आणि खासदारांची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत आमदार, खासदारांना पुरेसा वेळ देण्यात आला. मात्र, आज पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली असून महाविकास आघाडीबाबत आणि शिवसेनेच्या आमदार, खासदारांबाबत काय रणनिती आखणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisement -

एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे शिवसेनेचे आमदार

1) एकनाथ शिंदे
2) अनिल बाबर
3) शंभूराजे देसाई
4) महेश शिंदे
5) शहाजी पाटील
6) महेंद्र थोरवे
7) भरतशेठ गोगावले
8) महेंद्र दळवी
9) प्रकाश अबिटकर
10) डॉ. बालाजी किणीकर
11) ज्ञानराज चौगुले
12) प्रा. रमेश बोरनारे
13) तानाजी सावंत
14) संदीपान भुमरे
15) अब्दुल सत्तार नबी
16)प्रकाश सुर्वे
17) बालाजी कल्याणकर
18) संजय शिरसाठ
19) प्रदीप जयस्वाल
20) संजय रायमुलकर
21) संजय गायकवाड
22) विश्वनाथ भोईर
23) शांताराम मोरे
24) श्रीनिवास वनगा
25) किशोरअप्पा पाटील
26) सुहास कांदे
27) चिमणआबा पाटील
28) सौ. लता सोनावणे
29) प्रताप सरनाईक
30) सौ. यामिनी जाधव
31) योगेश कदम
32) गुलाबराव पाटील
33) मंगेश कुडाळकर
34) सदा सरवणकर
35) दीपक केसरकर
36) दादा भुसे
37) संजय राठोड

अपक्ष आमदार

1) बच्चू कडू
2) राजकुमार पटेल
3) राजेंद्र यड्रावकर
4) चंद्रकांत पाटील
5) नरेंद्र भोंडेकर
6) किशोर जोरगेवार
7) सौ.मंजुळा गावित
8) विनोद अग्रवाल
9) सौ. गीता जैन


हेही वाचा : आम्ही विमानात बसणार इतक्यात तुम्ही.., शिंदेंनी ट्विट केलेल्या पत्रानंतर अयोध्येबाबत मोठा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -