घरमनोरंजनमल्लिका शेरावतचा Rk/Rkay 'या' दिवशी होणार प्रदर्शित!

मल्लिका शेरावतचा Rk/Rkay ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित!

Subscribe

प्रियांशी फिल्म्स (प्रियाम श्रीवास्तव आणि हर्षिता करकरे) निर्मित या चित्रपटात मल्लिका शेरावत, कुब्रा सैत, रणवीर शौरी, मनु ऋषी चढ्ढा, चंद्रचूर राय, अभिजित देशपांडे, अभिषेक शर्मा, ग्रेस गिरधर आणि वैशाली मल्हारा यांच्या प्रमुख भूमिका आहेत

‘Rk/Rkay’ ही एका चिंताग्रस्त दिग्दर्शकाची (आरके) कथा आहे ज्याने त्याच्या नवीन चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे, परंतु एडिटिंग टेबलवर गोष्टी मनासारख्या होत नाहीयेत. आरकेच्या मनात काहीतरी गडबड होण्याची आशंका आहे. आणि त्याचे सर्वात वाईट स्वप्न प्रत्यक्षात उतरते जेव्हा तिला एडिट रूममधून त्रासदायक कॉल येतो, चित्रपटाचा नायक चित्रपटाच्या कथानकाचा ताबा घेवून प्रोजेक्टमधून बाहेर पडला आहे. मेहबूबचा चित्रपट संपला आहे- आरके आणि त्याच्या टीमने त्याला शोधून चित्रपटात परत पाठवायला पाहिजे आहे.

चित्रपटाबद्दल बोलताना रजत कपूर म्हणतात, “Rk/Rkay ची कल्पना माझ्या मनात जवळपास गेली 10 वर्षे होती. हळुहळू तिचे सध्याचे स्वरूप सापडत गेले. हा एक मॅड चित्रपट आहे.. आणि मी याला मॅड सर्वार्थाने म्हणतो आहे. हा चित्रपट अपारंपरिक, विक्षिप्त आणि मजेदार असून त्याची चव वेगळी आहे. मी आमच्या प्रेक्षकांची यावरची प्रतिक्रिया पाहण्यासाठी अतिशय उत्सुक आहे.”

- Advertisement -

प्रियांशी फिल्म्स (प्रियाम श्रीवास्तव आणि हर्षिता करकरे) निर्मित या चित्रपटात मल्लिका शेरावत, कुब्रा सैत, रणवीर शौरी, मनु ऋषी चढ्ढा, चंद्रचूर राय, अभिजित देशपांडे, अभिषेक शर्मा, ग्रेस गिरधर आणि वैशाली मल्हारा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘RK/Rkay’ रजत कपूर, मिथक टॉकी द्वारे लिहीले आणि दिग्दर्शित केले आहे आणि एनफ्लिक्स प्राइवेट लिमिटेड (नितीन कुमार आणि सत्यव्रत गौड) द्वारा प्रियाशी फिल्म्स प्रॉडक्शन प्रस्तुत आहे.

विशेष म्हणजे, रजत कपूरचा हा चित्रपट ‘Rk/Rkay’ रिलीज होण्यास एक महिना उरला आहे, परंतु हा कॉमेडीपट यापूर्वीच शांघाय इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, फ्लॉरेन्समधील रिव्हर टू रिव्हर यासह
ऑस्टिन फिल्म फेस्टिव्हल आणि पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अशा
अनेक आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलमध्ये दाखवला गेला आहे आणि त्याचे कौतुक झाले आहे.थोडक्यात ‘RK/Rkay’ हा फ्रेंडली मनोरंजनाच्या शोधात असलेल्यांसाठी एक उत्तम सिनेमा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -