घरताज्या घडामोडीशिवसेना संपणार नाही, व्हिप मोडणाऱ्या आमदारांवर कारवाई होणार - आदित्य ठाकरे

शिवसेना संपणार नाही, व्हिप मोडणाऱ्या आमदारांवर कारवाई होणार – आदित्य ठाकरे

Subscribe

शिवसेना कधीच संपणार नाही. ज्यांना जन्म पक्षात अशा प्रकारचे कृत्य केलं. ते दुसऱ्या पक्षातसुद्धा बंडखोरी करतील असे आदित्य ठाकरे म्हणाले. बंडखोर आमदार जनतेला भेटतील तेव्हा पाहू असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेत व्हिपवरुन संघर्ष निर्माण झाला आहे. विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हिप जारी केला होता. बंडखोर शिंदे गटाने शिवसेनेच्या व्हिपविरोधात मतदान केलं आहे. या आमदारांवर कारवाई करणार असल्याचा इशारा माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरसुद्धा ही कारवाई होणार आहे. न्यायालयात दाद मागणार असल्याचेसुद्धा आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी विधान भवनाच्या परिसरात माध्यमांशी संवाद साधताना बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रात मध्यावदी निवडणुका लागण्याची शक्यता आहे. जनता या निवडणुकांसाठी सज्ज आहे. आम्हीसुद्धा निवडणुकांसाठी सज्ज आहोत. शिवसेना कधीच संपणार नाही. ज्यांना जन्म पक्षात अशा प्रकारचे कृत्य केलं. ते दुसऱ्या पक्षातसुद्धा बंडखोरी करतील असे आदित्य ठाकरे म्हणाले. बंडखोर आमदार जनतेला भेटतील तेव्हा पाहू असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

विधानसभेच्या विशेष अधिवेशनात रविवारी आणि सोमवारी शिवसेनेच्या व्हिपचे उल्लंघन झालं आहे. त्याच्यावर आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका करणार आहोत. तसेच त्यांच्यावर कारवाई होणार आहे. शिंदे गटातील आमदार लोकांमध्ये जातील तेव्हा समजेल. मतदारसंघात गेल्यावर मतदारांना भेटतील तेव्हा त्यांना समजेल मतदारांना काय वाटत आहे.

वाहतूक कोंडीमुळे सभागृहात पोहचण्यासाठी उशीर झाला

विधानसभा सभागृहात बहुमताच्या चाचणीसाठी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे उशीरा दाखल झाले. यावर त्यांनी सांगताना ट्रॅफिक लागल्यामुळे उशीर झाला असे सांगितले. तसेच काँग्रेसच्या दोन नेत्यांना उशीर झाला ते लॉबीमध्ये दाखल झाल्यानंतर सभागृहाचे दरवाजे बंद करण्यात आले असे आदित्य ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : शिवसेनेला संपवण्यासाठी शिंदेंना लढवतायत, शिवसेना रक्तपात होऊन संपेल – भास्कर जाधव

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -