घरठाणेतक्रारींचे अर्धशतक तर पावसाचे शतक

तक्रारींचे अर्धशतक तर पावसाचे शतक

Subscribe

गेल्या चोवीस तासात ठाणे शहराला पावसाने चांगलेच झोडपले आहे. शहरात ९९.७७ मिमी पावसाची नोंद झाल्याने आतापर्यंत एकूण ९८७.७४ मिमी पाऊस पडला. तर तब्बल ५४ तक्रारी ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षेत प्राप्त झाल्या आहे.

गेल्या चोवीस तासात ठाणे (Thane) शहराला पावसाने चांगलेच झोडपले आहे. शहरात ९९.७७ मिमी पावसाची नोंद झाल्याने आतापर्यंत एकूण ९८७.७४ मिमी पाऊस पडला. तर तब्बल ५४ तक्रारी ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षेत प्राप्त झाल्या आहे. यामध्ये सर्वाधिक २१ तक्रारी झाडे कोसळण्याचा असून ५ तक्रारी सखल भागात पाणी साचल्याबाबतच्या आहेत. यावरून चोवीस तासात ठाणे शहरामध्ये तक्रारींचे अर्धशतक आणि पावसाचे शतक असेच म्हणावे लागले. (thane people complaints on civic issues due to rainfall)

अतिवृष्टीचा अंदाज

- Advertisement -

शहरात ११ जुलै रोजी सकाळी ८.३० ते १२ जुलै रोजी सकाळी ८:३० वाजेपर्यंत मागील २४ तासाचा अहवालात ९९.७७ मिमी बसरल्याची नोंद झाली आहे. एकीकडे अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला जात असताना, शहरात मधेमधे जोराची सरी येते होत्या. त्यातच वाराही तितकाच आहे. सोमवारी रात्री ७.३० ते ९.३० या दोन तासात ४१ मिमी पाऊस झाला.त्यानंतर अधूनमधून पावसाच्या मोठ्या सरी येत होत्या. तसेच मंगळवारी सकाळी ६.३० ते ७.३० या एक तासात १२ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे.

एकीकडे पावसाने शतक ठोकले असताना, दुसरीकडे तक्रारींचा आकडा ही ५४ वर पोहोचला आहे. यामध्ये २१ तक्रारी फक्त झाडे उन्मळून पडल्याचा आहेत. त्यापाठोपाठ इतर आणि झाडांच्या फांदया पडल्याच्या प्रत्येकी १० तक्रारी आहेत. सखल भागात पाणी साचल्याच्या ५, धोकादायक स्थितीत असलेल्या झाडांच्या ३, इमारतीचा भाग पडण्याची आणि पत्र्याची शेड धोकादायक असल्याची प्रत्येकी १ तक्रार नोंदविण्यात आली आहे.

- Advertisement -

या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झालेली नसून झाडांमुळे काही सुरक्षा भिंतींचे, घराचे तर माजीवडा मानपाडा येथील महापालिकेच्या तळ अधिक एक मजली शौचालय आहे. त्याच्यावर झाड पडल्याने वरील घराला तडे गेल्याने ते घर तातडीने रिकामे केले अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

या ठिकाणी पाणी साचले

ठाण्यातील लुईसवाडी बिर्ला हॉस्पिटलच्या बाजूला, वंदना एसटी डेपो समोरील रस्त्यावर, मुंब्र्यातील भगत चाळीजवळील नाला तुंबला, वागळे इस्टेट रोड नंबर २८ येथील तुकाराम पाटील चाळीतील एका घरात पाणी साचले. याठिकाणी वेळीच उपाययोजना राबवून पाण्याचा उपसा करण्यात आला.


हेही वाचा – दिलासादायक! सततच्या पावसामुळे राज्यातील धरणांत ३२ टक्के जलसाठा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -