घरदेश-विदेशअधिक पगार हवाय? मग बेंगळुरूत जा

अधिक पगार हवाय? मग बेंगळुरूत जा

Subscribe

'लिंक्डइन' ने पहिल्यांदाच देशात सर्वाधिक वेतनासंदर्भात एक सर्व्हेक्शन केले आहे. यामध्ये नोकऱ्यांमध्ये अधिक वेतन देणारे बंगळुरू प्रथम क्रमांकावर असल्याचे सांगितले आहे.

महिनाभर दिवस भरून शेवटी पगार किती मिळतो यावर नोकर वर्गीयांचे लक्ष असते. ज्यादा पगार मिळावा म्हणून अनेक कर्मचारी देशाबाहेर जाण्याचा मार्ग स्विकारतात. मायदेशापासून राहूनच अधिक पगार मिळतो अशी समज लोकांमध्ये असते. मात्र तेथे राहणे आणि खाण्याचा खर्च परवडत नसल्याने अनेक कर्मचारी हे आपल्या मातृभूमीत परततात. मात्र आता देशातच राहून जर तुम्हाला अधिक पगार बेंगळुरूत मिळणार आहे. देशात सर्वाधिक पगाराच्या नोकऱ्या हार्डवेअर ऑण्ड नेटवर्किं, सॉफ्टवेअर अॅण्ड आयटी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्वाधिक पगार बंगळुरूत मिळतो. यानंतर मुंबई आणि दिल्लीचा क्रमांक लागतो. एक सर्व्हेक्षणामध्ये ही माहिती समिती आहे.

लिंक्डइन ने केले सर्वेक्षण

‘लिंक्डइन’ ने पहिल्यांदाच देशात सर्वाधिक वेतनासंदर्भात एक सर्व्हेक्शन केले. यामध्ये ही बाब समोर आली आहे. आयटी हब अशी ओळख असलेल्या बेंगळुरूत सर्वाधिक वेतन मिळत असल्याचे त्यात सांगितल्या गेले आहे. यानंतर मुंबई आणि दिल्लीचा क्रमांक लागतो. अहवालात दिलेल्या माहितीनुसार हार्डवेअर अॅण्ड नेटवर्किंग नोकरदारांना १५ लाख रुपये वार्षिक वेतन दिले जाते. तर सॉफ्टवेअर क्षेत्रातील नोकरदारांना १२ लाख आणि कन्झ्युमर क्षेत्रातील नोकरदारांना नऊ लाख रूपये वर्षिक वेतन दिले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -