घरताज्या घडामोडीकानपुर हिंसाचार- दगडफेक करणाऱ्यांना ५०० तर पेट्रॉल बॉम्ब फेकणाऱ्यास ५००० रुपये, SIT...

कानपुर हिंसाचार- दगडफेक करणाऱ्यांना ५०० तर पेट्रॉल बॉम्ब फेकणाऱ्यास ५००० रुपये, SIT ने दाखल केली केस डायरी

Subscribe

कानपूर हिंसाचार घडवण्यासाठी जमावाला पैसे देण्यात आल्याचे डायरीत नमूद करण्यात आले आहे. पब्लिक प्रॉसिक्युटर दिनेश अग्रवाल यांनी ही केस डायरी दाखल केली आहे.

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध करण्यासाठी गेल्या महिन्यात कानपूरमध्ये एका स्थानिक संघटनेने बंदचे आवाहन केले होते. यावेळी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेचा तपास विशेष पथकाकडे देण्यात आला आहे . या पथकाने न्यायालयात केस डायरी दाखल केली आहे. यात काही धक्कादायक खुलासे करण्यात आले असून हिंसाचार घडवण्यासाठी जमावाला पैसे देण्यात आल्याचे डायरीत नमूद करण्यात आले आहे. पब्लिक प्रॉसिक्युटर दिनेश अग्रवाल यांनी ही केस डायरी दाखल केली आहे.

पेट्रॉल बॉम्ब फेकणाऱ्यांना ५००० रुपये

- Advertisement -

केस डायरीतील माहितीप्रमाणे दगडफेक करणाऱ्यांना ५०० ते १००० रुपये देण्यात आले होते. तर ज्यांनी या हिंसाचारात पेट्रॉल बॉम्बचा वापर केला त्यांना ५००० रुपये देण्यात आले आहेत. तसेच पोलिसांनी पकडल्यास मोफत कायदेशीर मदत केली जाईल असे आश्वासनही या समाजकंटकांना देण्यात आल्याचे डायरीत म्हटले आहे. त्याचबरोबर हिंसाचार कसा घडवायचा याचे ७ दिवसीय स्पेशल ट्रेनिंगही आंदोलनकत्यांना देण्यात आल्याचे या डायरीत म्हटले आहे.

नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानानंतर कानपूर येथे शुक्रवारच्या नमाज पढणानंतर हिंसाचार उसळला होता. त्यानंतर एक महिन्यांनी याप्रकरणी ३ पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यातील २ पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. तसेच या हिंसाचाराचा मास्टर माईंड हयात जफर आणि त्याच्या साथीदार जावेद अहमद खान, मो सुफियान आणि मोहम्मद राहील यांची रवानगी जेलमध्ये करण्यात आली. दरम्यान तपासामध्ये २२ नेत्यांची नावेही समोर आली असून हे सर्व नेते पांढरपेशा वर्गातील आहेत. सध्या ते एटीएसच्या रडारवर आहेत. यात एका महिलेचाही समावेश आहे.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -