घरदेश-विदेशएयर इंडिया एक्सप्रेस दुबई-कालिकत विमानाचे कोलकाता विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग

एयर इंडिया एक्सप्रेस दुबई-कालिकत विमानाचे कोलकाता विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग

Subscribe

आदिस अबाबाहून बँकॉकला जाणाऱ्या इथिओपियन एअरलाइन्सच्या विमानाला दबावाच्या समस्येमुळे कोलकाता विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

इंडिगो विमानाचे कराचीत इमर्जन्सी लँडिंग केल्यानंतर काही तासांनी एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचाही अपघात टळला. कालिकतहून दुबईला जाणाऱ्या विमानात अचानक जळण्याचा वास आला. त्यानंतर हे विमान मस्कदच्या दिशेने वळवण्यात आले. डीजीसीएने सांगितले की, विमानाच्या फॉरवर्ड गॅलीतील व्हेंटमधून जळण्याचा वास येत होता. (Emergency landing of Air India Express Dubai Calicut flight at Kolkata airport)

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. विमानाच्या फॉरवर्ड गॅलीतील व्हेंटमधून जळण्याचा वास येत असल्यामुळे वैमानिकाने प्रसंगावधान दाखवत इमर्जन्सी लॅंडिंग केले. या घटनेमुळे विमानातील प्रवाशांचा खोळंबा झाला.

- Advertisement -

दरम्यान, रविवारी सकाळी इंडिगो शारजाह-हैदराबाद विमान पाकिस्तानमधील कराचीला वळवण्यात आले होते. वैमानिकाने विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती दिली. त्यानंतर या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. सध्या या विमानतळावर या विमानाची तपासणी केली जात आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एअरलाइन्सने दुसरे विमान कराचीला पाठवले आहे.

दरम्यान, दोन आठवड्यांत सलग दुसऱ्यांना कराचीमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. शिवाय, याआधी 5 जुलै रोजी नवी दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाने तांत्रिक बिघाडामुळे पाकिस्तानच्या कराची विमानतळावर सावधगिरीने लँडिंग केले होते. 5 जुलै रोजी स्पाईसजेट B737 विमान ऑपरेटिंग फ्लाइट SG-11 (दिल्ली-दुबई) इंडिकेटर लाइटमध्ये बिघाड झाल्यामुळे कराचीला वळवण्यात आले.

- Advertisement -

या आठवड्यात बुधवारी दिल्लीहून इंफाळला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाचे कोलकात्यात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. हे विमान इंफाळमध्ये उतरणार होते, परंतु तेथील खराब हवामानामुळे लँडिंग होऊ शकले नाही, त्यामुळे ते कोलकाता विमानतळावर उतरावे लागले. विमानाचे इंधनही संपणार होते. विमानात एकूण 141 प्रवासी होते.


हेही वाचा – सोमवारपासून ‘या’ वस्तूंच्या किमतीत होणार वाढ; सर्वसामान्यांना बसणार आर्थिक फटका

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -