घरटेक-वेक५ जी स्पेक्ट्रमच्या लिलावाला आजपासून सुरुवात; अदानी, रिलायन्ससह चार कंपन्या शर्यतीत

५ जी स्पेक्ट्रमच्या लिलावाला आजपासून सुरुवात; अदानी, रिलायन्ससह चार कंपन्या शर्यतीत

Subscribe

ट्रायकडून भोपाळ, नवी दिल्ली विमानतळ, कांडला पोर्ट आणि बंगळुरु या चार ठिकाणी 5 जीच्या पायलट चाचण्याही सुरू करण्यात आल्या आहेत.

दूरसंचार क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवणारी महत्त्वाची प्रक्रिया आज घडणार आहे. कारण, आजपासून ५ जी स्पेक्ट्रमच्या ९ फ्रिक्वेन्सी बँडचा लिलावाला सुरुवात होणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी सहा या काळात लिलाव सुरू असेल. रिलाअन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि अदानी डेटा या चार कंपन्या लिलावासाठी शर्यतीत असून ट्रायकडून भोपाळ, नवी दिल्ली विमानतळ, कांडला पोर्ट आणि बंगळुरु या चार ठिकाणी 5 जीच्या पायलट चाचण्याही सुरू करण्यात आल्या आहेत. (5G spectrum auction started from today, adani, reliance with 4 companies fray)

दूरसंचार क्षेत्रातील बदलामुळे मानवी जीवनात क्रांती झाली आहे. आतापर्यंत आपण ४ जी सेवेचा लाभ घेत होतो. ३ जी वरून ४ वर येताना झालेला बदल प्रकर्षाने जाणवतो. इंटरनेट सुविधा सुधारली त्यामुळे तंत्रज्ञानातही वेगाने बदल झाला. आता त्यात ५ जी ची भर पडणार आहे. त्यामुळे तंत्रज्ञान अधिक गतिमान होईल. ५ जी मुळे इंटरनेट सेवेचा वेग वाढल्याने मानवी जीनवमानही तितक्याच गतीने प्रगती करू शकेल. मात्र, या सेवेसाठी ग्राहकांच्या खिशाला अधिक झळ बसू शकते. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपर्यंत देशात ५ जी सेवा सुरू होण्याची शक्यता सरकारने व्यक्त केली आहे.

- Advertisement -

७२ GHz स्पेक्ट्रमसाठी ४.३ लाख कोटींची बोली लावली जाणार आहे. तसेच, स्पेक्ट्रमसाठी येणाऱ्या बोली आणि बोली लावणाऱ्यांच्या धोरणांवर लिलाव प्रक्रियेचा काळ ठरतो. त्यामुळे लिलाव प्रक्रिया कितीवेळ चालू शकते याचा अंदाज लावणं कठीण आहे, अशी दूरसंचार विभागातील सूत्रांनी माहिती दिली. मात्र, लिलाव दोन दिवसांत संपेल असं उद्योजकांनी म्हटलं आहे.

५ जी वैशिष्ट्य काय आहेत?

४ जी सेवेतून १०० एमबीपीएस गती मिळते. रिलअ वर्ल्ड परफॉर्मन्स ३५ एमबीपीएसपेक्षा जास्त नसतो. मात्र, ५ जी मध्ये तुम्हाला ४ जी पेक्षा १०० टक्के जास्त स्पीड प्राप्त होईल. २० जीबीपीएस ही ५ जीची टॉप थिओरिटिकल स्पीड आहे. तर, रिलअ वर्ल्डमध्ये ५० एमबीपीएस ते ३ जीबीपीएसमध्ये सेवा देऊ शकतो.

- Advertisement -

एखाद्या माहितीला (Information Pocket) एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत पोहोचायला वेळ लागतो, त्यालाच लेटेंसी असं म्हणतात. ४ जी नेटवर्कमध्ये ही लेटेंसी जवळपास ५० मिलिसेकंद आहे. तर, ५ जीमध्ये १ मिलिसेकंद ही सर्व्हिस मिळेल.

दहा वर्षांपूर्वी भारतात ४ जी सेवा लॉन्च झाली. मात्र, आजही दुर्गम किंवा ग्रामीण भागात ४ जी सेवा पोहोचलेली नाही. अनेक गावात अजूनही २ जी किंवा ३ जी कनेक्टिव्हिटी आहे. त्यामुळे भारतातील अनेक भागात ५ जी सेवा पोहोचायला वेळ लागू शकतो. अमेरिकेत आता जवळपास २९६ शहरांत ५ जी सेवा उपलब्ध आहे. पण त्या २९६ शहरांपैकी अनेकठिकाणी ५ जीचं कव्हरेज फार खराब असल्याचं सांगितलं जातं.

४जी सेवा घेताना एकाच लोकेशनमध्ये अनेक डिव्हाइस कनेक्ट करताना अनेक अडचणी येतात. मात्र, ५ जी वापरताना प्रति किलोमीटर तुम्ही अनेक डिव्हाईस कनेक्ट करू शकता.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -