घरदेश-विदेशअब हिंदु चूप नही बैठेगा - उद्धव ठाकरे

अब हिंदु चूप नही बैठेगा – उद्धव ठाकरे

Subscribe

अब हिंदु चूप नही बैठेगा असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी सरकारला दिला. राम दर्शनासाठी अयोध्येत गेलेल्या उद्धव ठाकरे यांनी हा इशारा दिला आहे.

अब हिंदु चूप नही बैठेगा अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या मुद्यावरून सरकारला इशारा दिला आहे. राम दर्शनासाठी अयोध्येमध्ये गेलेल्या उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना अयोध्येमध्ये राम मंदिर झालंच पाहिजे अशी मागणी देखील केली. मी कोणत्याही राजकारणासाठी अयोध्येत आलो नाही तर राम दर्शनासाठी अयोध्येत आल्याचं ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, सरकारनं राम मंदिरासाठी कायदा केल्यास शिवसेना त्याला पाठिंबा देईल असं देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. झोपलेल्या कुंभकर्णाला मी जागा करायला आल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांनी थेट सरकारला लक्ष्य केलं आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरासाठी किती वर्ष वाट पाहायाची असा सवाल केला आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर केव्हा बांधणार याचा तारीख सांगा म्हणत भाजपला २०१४च्या साली दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली. लक्ष्मण किल्ल्यावरून आशिर्वाद सभेदरम्यान उद्धव ठाकरे बोलत होते.

१९९२ साली हिंदु मार नही खायेगा असा इशारा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी दिली आहे. त्यानंतर आला उद्धव ठाकरे यांनी अब हिंदु चूप नही बैठेगा असं म्हटलं आहे.

वाचा – राम मंदिरासाठी अध्यादेश काढता येणार नाही – अमित शहा

वाचा – राम मंंदिरावरून बाबा रामदेवांचा सरकारला इशारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -