घरमहाराष्ट्रगोंदिया बलात्कार प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून दखल; रुपाली चाकणकरांची सरकारवर टीका

गोंदिया बलात्कार प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून दखल; रुपाली चाकणकरांची सरकारवर टीका

Subscribe

मुंबई : गोंदिया बलात्कार प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश महिला आयोगाने पोलिसांना दिले आहेत. त्याचबरोबर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपायली चाकणकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

- Advertisement -

पतीपासून विभक्त झालेली पीडित महिला गोंदियामध्ये राहणाऱ्या तिच्या बहिणीकडे आली होती. 30 जुलैला बहिणीसोबत भांडण झाल्याने तिने रात्री बहिणीचे घर सोडले. त्यानंतर तीन दिवस तिच्यावर चौघांनी बलात्कार केला. याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लागलीच दखल घेऊन हा तपास एसआयटीमार्फत करण्याचे जाहीर केले.

हेही वाचा – …तर, हिंदू गप्प बसणार नाही, भाजपा आमदार नितेश राणेंचा इशारा

- Advertisement -

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनीही ट्वीट करत या घटनेची दखल आयोगाने घेतली असल्याचे सांगितले. याप्रकरणी दोन आरोपींना अटक झाली असून उर्वरित एका आरोपीला तत्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलीस आपले काम करीत आहे. अशा घटना घडूच नयेत, यासाठी महिला आयोग प्रयत्न करत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारवर टीका
राज्याची कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे गृहमंत्र्यांचे काम असते. पण राज्याला गृहमंत्री नाहीत. रुपाली चाकणकर यांनी पुण्यात सांगितले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या घटनेची दखल घेऊन कोणाकडे तरी ही जबाबदारी सोपवावी आणि महिलांना सुरक्षितता द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

चित्रा वाघ यांची सावध प्रतिक्रिया
जेव्हा अशी घटना घडते, तेव्हा सत्ताधारी काय पावले उचलतात याला महत्त्व असते. आता शिवसेना-भाजपचे सरकार आले आहे त्यामुळे अशा घटना घडणारच नाही, असे म्हणणार नाही, अशी सावध प्रतिक्रिया भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी नागपुरात दिली आहे.

एका आरोपीने पीडितेला जंगलात डांबून ठेवले होते. त्यामुळे आम्ही या प्रकरणी पोलिसांकडे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – राज्याचा कारभार आता नोकरशहांच्या हाती, मुख्यमंत्र्यांचे आदेश

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -