घरताज्या घडामोडीप्रत्येक मराठी मनाला दुःख झालंय, 'तो' फोटो पाहून रोहित पवारांची एकनाथ शिंदेंसाठी...

प्रत्येक मराठी मनाला दुःख झालंय, ‘तो’ फोटो पाहून रोहित पवारांची एकनाथ शिंदेंसाठी पोस्ट

Subscribe

प्रत्येक मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात" असं रोहित पवार यांनी फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नीती आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. या चर्चेनंतर बैठकीत उपस्थित असलेल्या सर्वांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेवटच्या रांगेत स्थान दिल्याचं दिसत आहे. यावरून राष्ट्रावादीचे नेते रोहीत पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. (Rohit Pawar facebook post on eknath shinde niti ayog meeting photo)

“एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात” असं रोहित पवार यांनी फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -


राष्ट्रपतींनी संबोधित केले त्यावेळी एकनाथ शिंदे पहिल्या रांगेत होते. त्यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याजवळ उभे होते. त्यावर पवार काही बोलले नाहीत. परंतु, शेवटच्या रांगेवरून टिप्पणी केली, असं प्रत्युत्तर भाजपचे आमदार राम कदम यांनी केली. तसंच, ते म्हणाले की, अशा गोष्टींवरून टीका करणं योग्य नाही. यातून त्यांचं सत्तेत नसल्याचं दुखणं बाहेर येत आहे. फोटो काढत असताना थोडंसं पुढे मागे झालं असेल. पण त्यावेळी नक्की काय झालं होतं? हे तपासून पाहावं लागेल, असंही राम कदम म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -