घरताज्या घडामोडीआरे कारशेड हा तर देवेंद्र फडणवीसांचा इगो, सुनील राऊतांचा हल्लाबोल

आरे कारशेड हा तर देवेंद्र फडणवीसांचा इगो, सुनील राऊतांचा हल्लाबोल

Subscribe

राज्यात शिवसेनेच्या दोन गटांमध्ये संघर्ष सुरू असताना भाजप शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटावर सातत्याने हल्ले करताना दिसत आहेत. महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर भाजप-शिंदेगट सरकार राज्यात स्थापन झालं. परंतु महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय भाजपने सत्तेत आल्यापासून बदलले आहेत. यामधील एक निर्णय म्हणजे मुंबई मेट्रोचे कारशेड जैसे थे करणे. आरेमध्ये वृक्षतोड न करता हा प्रकल्प ठाकरे सरकारने कांजूर मार्गला हलवला होता. परंतु तोच प्रकल्प आता आरेमध्येच करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने केला आहे. दरम्यान, आरे कारशेड हा तर देवेंद्र फडणवीसांचा इगो, असं म्हणत आमदार सुनील राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

सुनील राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली. एक झाड म्हणजे एक जीव आहे. मुंबईमध्ये झाडे कमी, इमारती जास्त आहेत. त्यामुळे आरेमधील झाडे वाचवणे आवश्यक आहे. कांजूरमार्ग येथे जी सरकारी जमीन पडलेली आहे. त्या ठिकाणी कारशेड केलं तर तीन-साडेतीन हजार झाडांची कत्तल होण्यापासून वाचेल. ज्यामुळे मुंबईच्या लोकांना चांगला ऑक्सिजन मिळेल. परंतु हा उद्धव ठाकरेंचा इगो नसून देवेंद्र फडणवीसांचा आणि भाजपचा इगो आहे, असं सुनील राऊत म्हणाले.

- Advertisement -

राऊतांना शिंदे गटावर देखील निशाणा साधला आहे. राज्यात सध्या दहीहंडीसारखे राजकारण सुरू आहे. दहीहंडीमध्ये जे थर लागतात, ते कुणाच्या जीवावर लागतात? जे खाली जमिनीवरती उभे आहेत. त्यांच्याच जावीवर लागतात. त्यामुळे वरचे थर अनेकवेळा कोसळत असतात. पण बेस कधीच कोसळत नसतो. कारण आमचा बेस हा बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिकांपासून बनवलेला आहे. त्यामुळे वरचा थर बनवत असतो आणि खाली कोसळत असतो. पण शिवसेनाचा बेस अद्यापही मजबूत आहे, असा विश्वास सुनील राऊत यांनी व्यक्त केला.


हेही वाचा : बच्चू कडूंचा दुसऱ्या टप्प्यात होणार विचार, दीपक केसरकरांनी दिली माहिती

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -