घरताज्या घडामोडीनाशिकमध्ये शनिवारपासून पं. गोपीकृष्ण जयंती महोत्सव

नाशिकमध्ये शनिवारपासून पं. गोपीकृष्ण जयंती महोत्सव

Subscribe

विद्यार्थिनींच्या नादरुप पावलांनी अनलिश नृत्य प्रस्तुतीने महोत्सावास होणार प्रारंभ

किर्ती कलामंदिरातर्फे दरवर्षी नटराज पं. गोपीकृष्ण जयंती महोत्सवाचे आयोजन नाशिकमध्ये केले जाते. यावेळी ‘उडान’ या शीर्षकाखाली २९ वा पं. गोपीकृष्ण महोत्सव नाशिकमध्ये २० ते २२ ऑगस्ट २०२२ या कालावधीत होणार आहे. या तीनही दिवस सायंकाळी ५ वाजता पं. गोपीकृष्ण जयंती महोत्सव रंगणार आहे.

कला माणसाला समृद्ध आणि संपन्न जीवन जगण्याची ताकद देते. समस्या, परिवर्तन अपरिहार्य असते. काळ बदलतो, वेळ बदलते; पण कलेची साधना कलाकाराला प्रवाही ठेवते. या कला साधनांचा महोत्सव म्हणजे यंदाचा ‘उडान’ महोत्सव. कोरोनाकाळात नृत्यकलेचे शिक्षण ज्यांनी ऑनलाइन सुरु केले आणि सुरु ठेवले, त्या सर्व छोट्या-मोठ्या किर्ती कलामंदिराच्या विद्यार्थिनींच्या नादरुप पावलांनी ‘अनलिश’ या नृत्य प्रस्तुतीने महोत्सवाचा प्रारंभ प. सा. नाट्यगृहात शनिवारी (दि.२०) होणार आहे. प्रथम पुष्पात संस्थेची युवा नृत्यागना दुर्वाक्षी पाटील हिचे एकल नृत्य होणार आहे. दुसरे पुष्प पंडिता उमा डोगरा ‘इटर्नल बॉण्ड’ गुंफणार आहे.. यात प्रतिभावंत गुरू पं. दुर्गालाल यांचा नृत्यप्रवास चित्रफितीतून उलगडणार आहेत. गुरू शिष्याचं ही अमूल्य धरोहर रविवारी (दि.२१) कुसुमाग्रज स्मारक, गंगापूर रोड येथे रसिकांना अभुनवता येणार आहे. महोत्सवाचा समारोप सोमवारी (दि.२२) महाकवी कालिदास कलामंदिरामध्ये होणार आहे. महोत्सवाचे तिसरे पुष्प दिल्लीच्या विश्वदीप शर्मा या युवा नर्तकाच्या नृत्याविष्काराने आणि किर्ती कलामंदिराची ज्येष्ठ नृत्यांगणा आदिती पानसे दिग्दर्शित ‘स्पेक्ट्रम’ने होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -