घरदेश-विदेश'10 मुलांना जन्म द्या', व्लादिमीर पुतिन यांची अजब योजना

’10 मुलांना जन्म द्या’, व्लादिमीर पुतिन यांची अजब योजना

Subscribe

रशियाची लोकसंख्या वाढविण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन(Vladimir Putin) यांनी एक अजब योजना आणली आहे.

मागील दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात आलं होतं. कोरोनाचा प्रभाव सर्वच देशांवर दिसून आला. त्याचप्रमाणे कोरोना संकट आणि रशिया – युक्रेनच्या युद्धाचा(russia ukraine war) मोठा फाटका दोन्ही देशांना बसला आहे. तर रशियाच्या लोकसंख्येवर परिणाम झाला आहे. रशियाची लोकसंख्या वाढविण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन(Vladimir Putin) यांनी एक अजब योजना आणली आहे. रशियन महिलांनी 10 मुले जन्माला घालण्यासाठी आणि त्या मुलांच्या संगोपनासाठी 13,500 पौंड देण्याची घोषणा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केली आहे.

हे ही वाचा – संशयित बोटीत सापडलेल्या स्फोटक वस्तू एटीएसकडून जप्त, फॉरेन्सिक लॅबचं पथकही घटनास्थळी दाखल

- Advertisement -

रशिया आणि युक्रेनच्या युद्धात 50,000 सैनिकांचा मृत्यू

रशियाच्या लोकसंख्येत वाढ होण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन(Vladimir Putin) यांनी यांनी एक वेगळीच घोषणा केली आहे. या योजनेला ‘मदर हिरोईन'(Mother Heroine) असे नाव देण्यात आले आहे. रशियाची कमी होत चाललेली लोकसंख्या वाढावी म्ह्णून ही योजना आणण्यात आली आहे अशी रशियन सुरक्षा तज्ञ डॉ. जेनी मॅथर्स यांनी टाइम्स रेडिओवर संवाद साधताना माहिती दिली. रशिया आणि युक्रेनमध्ये जे युद्ध झालं त्यात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. तब्बल 50,000 हजारांहून अधिक रशियन सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनाच्या संकटामुळेही रशियातील अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ‘मदर हिरोईन’ योजनेची घोषणा केली आहे.

- Advertisement -

vladimir putin

हे ही वाचा – बक्षिसाचे लोणी चाखायला गोविंदा निघाले शहराबाहेर

नेमकी योजना काय ?

डॉ. जेनी मॅथर्स म्हणाल्या, ‘पुतिन(Vladimir Putin) यांचं म्हणणं आहे की ‘पुतिन यांचं असं म्हणणं आहे की मोठं कुटुंब असलेले लोक अधिक देशभक्त असतात’. अशातच देशभक्तीबद्दल बोलताना रशियातील महिलांना अधिक मुलांना जन्म देण्याचा संदेश पुतिन यांनी दिला आहे. युक्रेनसोबत युद्धाच्या संकटाचा धोका वाढत असताना. रशियाची लोकसंख्या सुद्धा वाढावी म्हणून ही योजना राबविण्यात येत आहे’. रशियाच्या महिलांना 10 लाख रूबल म्हणजेच 13.5 हजार पौंड दिले जाणार आहेत. एखाद्या महिलेच्या दहाव्या अपत्याच्या पहिल्या वाढदिवशी त्या महिलेला योजनेचे पैसे दिले जाणार आहे. पण या संदर्भात रशियन सरकारने एक अट सुद्धा ठेवली आहे. ती अशी की, जन्माला आलेले मुल पहिले एक पण रशियन सरकारची अट अशी आहे की, पहिलं नऊ मुलं सुद्धा जगली पाहिजेत तरच दहाव्या मुलाच्या पहिल्या वाढदिवशी योजनेचे पैसे मिळतील.

दरम्यान रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाला आता सहा महिने पूर्ण झाले आहेत. हे युद्ध एवढे दिवस एवढे दिवस चालेले अशी अपेक्षा कोणालाच नव्हती. या युद्धाचा परिणाम दोन्ही देशांना झाला तरीही दोन्ही देश मागे फिरायला तयार नाहीत.

हे ही वाचा – गोविंदा पथकांसाठी खुशखबर, राज्य सरकार भरवणार प्रो-गोविंदा स्पर्धा

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -