घरदेश-विदेशदिल्लीत शेतकरी काढणार आज २६ किलोमीटर पदयात्रा

दिल्लीत शेतकरी काढणार आज २६ किलोमीटर पदयात्रा

Subscribe

मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना फक्त आश्वासनच मिळत आहे. शेतकऱ्यांच्या दोन प्रमुख मागण्यांवरुन देशाच्या राजधानीत आंदोलन करण्यात येणार आहे.

देशाची राजधानी दिल्ली येथे हजारो शेतकरी आंदोलन करणार आहे. हे आंदोलन २९ आणि ३० नोव्हेंबर असे दोन दिवस काढण्यात येणार आहे. आंदोलनादरम्यान शेतकरी २६ किलोमीटर पदयत्रा काढणार आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवरून हा मोर्चा काढण्यात आला आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि नुकसान भरपाईच्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनात देशभरतील शेतकरी सहभाग घेणार आहेत. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आंदोलक दिल्लीतील बिजवासन परिसरात आले आहेत. आज सकाळी या पदयात्रेचे सुरुवात झाली आहे. ही पदयात्रा संध्याकाळी पाच वाजता दिल्लीतील रामलीला मैदानावर पोहचणार आहे. या आंदोलनात बंगाल, बिहार, ओडिशा, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यातील शेतकऱ्यांनी यात सहभाग घेतला.

योगेंद्र यादव करणार नेतृत्व

स्वराज्य इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि किसान नेता योगेंद्र यादव यांच्या नैतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाही. शेतकऱ्यांना आश्वासन दिले जाते. मात्र त्यांना दिलेले आश्वासन कोणतीही सरकार पुर्ण करत नसल्याने हे आंदोलन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. आज पदयात्रा काढण्यात येणार असून उद्या हे आंदोलन संसदेवर नेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -