घरताज्या घडामोडीभ्रष्ट लोकांविरुद्धच्या कारवाईमुळे राष्ट्रीय राजकारणात फूट, पीएम मोदींचं मोठं वक्तव्य

भ्रष्ट लोकांविरुद्धच्या कारवाईमुळे राष्ट्रीय राजकारणात फूट, पीएम मोदींचं मोठं वक्तव्य

Subscribe

भ्रष्ट लोकांविरुद्धच्या कारवाईमुळे राष्ट्रीय राजकारणात फूट पडल्याचं मोठं वक्तव्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नरेंद्र मोदी दोन दिवसीय केरळच्या यात्रेवर आहेत. कोची आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर आपल्या समर्थकांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, भ्रष्टाचार हा युवकांच्या विकासात आणि हिताचा सर्वात मोठा अडथळा आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

भ्रष्ट व्यक्तींवर कारवाई केल्याने राष्ट्रीय राजकारणात फूट पडल्याचे दिसून आले आहे. यासाठी काही राजकीय गट पुढे आले आहेत. राज्यात डबल इंजिनचं सरकार आहे. तसेच मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या मंत्राला अनुसरून भाजप सरकार मोठ्या संकल्पात बदल करत आहेत. केंद्र सरकारचे सर्वोच्च प्राधान्य गरीब, दलित, शोषित, वंचित, आदिवासींना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आहे.

- Advertisement -

पंतप्रधान मोदींनी संध्याकाळी 6 वाजता कोची मेट्रो, भारतीय रेल्वेच्या 4,500 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी केली आहे आणि ते राष्ट्राला समर्पित केले आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वीच देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे देशाला विकसित राष्ट्र बनवण्याच्या संकल्पावर काम करण्याची वेळ आहे. यात केरळच्या कष्टकरी लोकांचा मोठा वाटा आहे.

पंतप्रधान म्हणाले की, भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्रातील एनडीए सरकार केरळमधील लोकांच्या गरजा आणि आकांक्षांबाबत अत्यंत संवेदनशील आहे. आमचे सरकार देशातील प्रत्येक गरीबाला पक्के घर देण्याची मोहीम राबवत आहे. पीएम आवास योजनेंतर्गत केरळमधील गरिबांसाठी सुमारे दोन लाख पक्की घरे मंजूर करण्यात आली आहेत.


हेही वाचा :योगी सरकारच्या यूपीतील मदरशांच्या सर्वेक्षणाचे निर्णय म्हणजे ‘एनआरसीच’; ओवैसींचा गंभीर आरोप


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -