घरमनोरंजनबिग बींनी महाराणी एलिझाबेथ यांचे निमंत्रण स्वीकारण्यास दिला नकार

बिग बींनी महाराणी एलिझाबेथ यांचे निमंत्रण स्वीकारण्यास दिला नकार

Subscribe

महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनावर जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे. ज्यात बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचाही समावेश आहे. याचपार्श्वभूमीवर  बिग बी अमिताभ बच्चन आणि महाराणी एलिझाबेथ यांचाही एक किस्सा आज पुन्हा चर्चेत आला आहे.

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. इतिहासात ब्रिटनच्या सिंहासनावर प्रदीर्घकाळ विराजमान असलेल्या महाराणी म्हणून त्यांची नोंद झाली आहे. महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनावर जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे. ज्यात बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचाही समावेश आहे. याचपार्श्वभूमीवर  बिग बी अमिताभ बच्चन आणि महाराणी एलिझाबेथ यांचाही एक किस्सा आज पुन्हा चर्चेत आला आहे. बिग बींना एका कार्यक्रमासाठी महाराणी एलिझाबेथ यांनी निमंत्रित केले होते. मात्र बिग बींनी महाराणींचे निमंत्रण स्वीकारण्यास चक्क नकार दिला होता.

महाराणी एलिझाबेथ यांच्या शाही कुटुंबाकडून २०१७ साली फेब्रुवारी महिन्यात बंकिघम पॅलेसमध्ये युके इंडिया ईयर ऑफ कल्चर या महाइवेंटचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी जगातील काही ठराविक व्यक्तींनाच आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी भारत आणि ब्रिटन यांच्यातील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ व्हावे यासाठी एलिझाबेथ यांनी बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनाही आमंत्रित केले होते. मात्र बीग बींनी आपल्याला या कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही असे सांगत निमंत्रण स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यावेळी महाराणींचे निमंत्रण स्वीकारण्यास नकार देणाऱ्या बिग बींची जगभऱात चर्चा झाली. अनेकांनी बिग बींवर टीका केली होती. त्यावेळी बिग बींच्या टीमने एक पत्रक प्रसिद्ध केले . त्यात त्यांनी महाराणी एलिझाबेथ यांनी युके इंडिया ईयर ऑफ कल्चर कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवल्याचे सांगण्यात आले. पण आधीच काही कार्यक्रमांसाठी वचनबद्ध असल्याने बिग बी महाराणींच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार नाही असे म्हटले होते.

- Advertisement -

त्यावेळी बिग बी सरकार ३ या चित्रपटाच्या लॉन्चिंगमध्ये बिझी होते. तसेच अयान खान यांच्या ड्रॅगन , ठग्ज ऑफ हिंदुस्थान यासारख्या चित्रपटांचीही शूटींग सुरू होती. निर्माते आणि दिग्दर्शक यांना बीग बिंनी आधीच तारखा दिल्याने बिग बींना ब्रिटनला जाणे शक्य झाले नव्हते.

 

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -