घरमनोरंजनकार्तिक आर्यन आणि सारा अली खान पुन्हा एकत्र? व्हिडीओ चर्चेत

कार्तिक आर्यन आणि सारा अली खान पुन्हा एकत्र? व्हिडीओ चर्चेत

Subscribe

या व्हिडीओमध्ये कार्तिक आर्यनने काळ्या रंगाचा ब्लेजर आणि पांढरा शर्ट घातली आहे. तर सारा अली खानने पिवळ्या रंगाचा शिमरी ड्रेस घातला आहे. दोघेही एकत्र बसले असून मनमुराद गप्पा मारताना दिसत आहेत.

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. कार्तिक नुकताच मुंबईमध्ये आयोजित ओटीटी प्ले अवॉर्ड्समध्ये सहभागी झाला होता. जिथे बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील अभिनेता दिग्गज कलाकार उपस्थित होते. त्यावेळी अभिनेत्री सारा अली खान देखील उपस्थित होती. यावेळी हे एक्स कपल एकत्र बसलेले दिसून आले. इतकचं नव्हे तर दोघं एकमेकांसोबत गप्पा देखील मारताना दिसले. या इवेंटमधून एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये सारा आणि कार्तिक एकत्र बसून गप्पा मारत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये कार्तिक आर्यनने काळ्या रंगाचा ब्लेजर आणि पांढरा शर्ट घातली आहे. तर सारा अली खानने पिवळ्या रंगाचा शिमरी ड्रेस घातला आहे. दोघेही एकत्र बसले असून मनमुराद गप्पा मारताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये दोघांना एकत्र पाहून त्यांचे चाहते खूप खूश झाले आहेत.

- Advertisement -

- Advertisement -

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सारा आणि कार्तिकचे चाहते त्या दोघांना एकत्र पाहून खूप खूश झाले आहेत. कार्तिक आणि सारा पूर्वी एकमेकांना डेट करत होते.

‘लव आज कल’ च्या सेटवर झालं प्रेम
मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक आणि सारा यांच्या ‘लव आज कल’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघांचं अफेयर सुरू झालं होतं. मात्र त्यानंतर काही दिवसात दोघं एकमेकांपासून वेगळे झाले.

दरम्यान, मुंबईमध्ये आयोजित झालेला हा पहिला ओटीटी अवॉर्ड होता. शनिवारी संध्याकाळी या अवॉर्ड फंक्शनमध्ये अनेक कलाकार उपस्थित झाले होते.


हेही वाचा :

अवघ्या तीन दिवसात ‘ब्रह्मास्त्र’ने केला 100 कोटींचा टप्पा पार

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -