घरताज्या घडामोडीरुग्णवाहिका नसल्याने अपघातग्रस्त तरुणाला जेसीबीतून नेले रुग्णालयात

रुग्णवाहिका नसल्याने अपघातग्रस्त तरुणाला जेसीबीतून नेले रुग्णालयात

Subscribe

मध्यप्रदेशात आरोग्य सेवा आणि रुग्णवाहिका सेवेशी संबंधित निष्काळजीपणाची प्रकरणे दररोज समोर येत आहेत. नुकताच सरकारी यंत्रणांचा निष्काळजीपणा उघड करणारे चित्र मध्य प्रदेशच्या कटनी जिल्ह्यातून समोर आले आहे.

मध्यप्रदेशात आरोग्य सेवा आणि रुग्णवाहिका सेवेशी संबंधित निष्काळजीपणाची प्रकरणे दररोज समोर येत आहेत. नुकताच सरकारी यंत्रणांचा निष्काळजीपणा उघड करणारे चित्र मध्य प्रदेशच्या कटनी जिल्ह्यातून समोर आले आहे. कटनी येथे एका रस्ते अपघातात जखमी तरुणाला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहीका आली नव्हती. जवळपास अर्ध्या तासाहून अधिक काळ रुग्णवाहिका आली नाही. त्यामुळे जखमी तरुणाला जेसीबीच्या पंजावर झोपवून रुग्णालयात नेण्यात आले. (mp a young man injured in road accident was taken to hospital by jcb)

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या कटनी जिल्ह्यातील खिटौली रोडवर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यामध्ये गैरतलाई येथील रहिवासी महेश बर्मन हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती पाहून स्थानिकांनी रुग्णवाहिकेलाही कळविले. मात्र, अर्धा तास प्रतीक्षा करूनही रुग्णवाहिका घटनास्थळी न पोहोचल्याने जेसीबी चालक पुष्पेंद्र विश्वकर्मा यांनी माणुसकी दाखवत जखमी तरुणाला जेसीबीच्या पंजावर रुग्णालयात नेले.

- Advertisement -

या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासंदर्भात “दुकानासमोर दुचाकीची धडक झाली. रुग्णवाहिका व इतर वाहने न सापडल्याने त्यांना जेसीबीने रुग्णालयात आणण्यात आले. या घटनेत तरुणाचा एक पाय फ्रॅक्चर झाला आहे. प्राथमिक उपचारानंतर जखमीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे”, असे जेसीबी चालक पुष्पेंद्र विश्वकर्मा यांनी सांगितले.

मध्य प्रदेशात हे काही नवीन नाही, आठवड्याला आठवडाभर प्रत्येक जिल्ह्यातून अशी चित्रे पाहायला मिळतात. सरकार कितीही चांगल्या आरोग्य सुविधांचा दावा करत असले तरी ही चित्रे सरकारच्या दाव्याची पोलखोल करतात. दरम्यान, मध्य प्रदेश सरकारच्या आरोग्य विभागाचे बजेट प्रचंड आहे. पण त्याचा फायदा लोकांना होताना दिसत नाही.

- Advertisement -

हेही वाचा – महाराष्ट्रातील प्रकल्पांवर आधीपासून डोळा, ‘हे’ प्रकल्प गेले गुजरातमध्ये

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -