घरमहाराष्ट्रमी दोन टर्मचा खासदार, कुठे बसायचं हे मला कळतं; श्रीकांत शिंदेंचा 'त्या'...

मी दोन टर्मचा खासदार, कुठे बसायचं हे मला कळतं; श्रीकांत शिंदेंचा ‘त्या’ फोटोप्रकरणी राष्ट्रवादीवर पलटवार

Subscribe

मुंबई – मी दोन टर्मचा खासदार आहे. कुठे बसायचं, कुठे नाही हे मला चांगलंच समजतं. माझ्यावर राजकीय हेतुने आरोप केले जात आहेत, असा पलटवार खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केलाय. राष्ट्रवादीचे नेते रविकांत वरपे  यांनी आज एक फोटो ट्विट करत खळबळ उडवून दिली होती. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत श्रीकांत शिंदे कारभार चालवतात, श्रीकांत शिंदे सुपर सीएम आहेत, असा आरोप रविकांत वरपे यांनी केला होता.

राष्ट्रवादीचे नेते रविकांत वरपे यांनी आज सोशल मीडियावर एक फोटो ट्विट करून खळबळ उडवून दिली होती. श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर बसले असल्याचा आरोप करत हा फोटो ट्विट करण्यात आला होता. श्रीकांत शिंदे ज्या खुर्चीवर बसले होते, त्यामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा शासकीय फलक होता. त्यामुळे श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याचा दावा रविकांत वरपे यांनी केला. यावरून आज सकाळपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे की, मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे पूत्र खासदार डॉ.श्रीकांत शिंदे कारभार हाकतात की काय? श्रीकांत शिंदेवर झालेल्या या आरोपावर ते काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वाचं लक्ष असतानाच त्यांनी याबाबत खुलासा केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – खासदार श्रीकांत शिंदे बसले मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत, सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल

- Advertisement -

डॉ.श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले की, आज सकाळपासून ज्या बातम्या चालवल्या जात आहेत ते सर्व हास्यास्पद आहे. एकनाथ शिंदे सक्षम मुख्यमंत्री आहेत. ते दिवसाचे १८-२० तास काम करतात. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीत कोणालाही काम करण्याची काहीच गरज नाही. ते आमच्या घरचं ऑफिस आहे. ठाण्यातील लुईसवाडीतील ते घर आहे. दोघेही आम्ही या ऑफिसचा वापर करतो.


मुख्यमंत्री होण्याआधीपासून नागरिक येथे येत असतात. आम्हाला भेटत असतात. त्यांची गाऱ्हाणी सांगत असतात. लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम येथून होत असतं. हे घर शासकीय नाही, मी काही मंत्रालयात बसलेलो नाही. त्यामुळे मला बदनाम करण्याचं काम होतंय. हे आमचं घर आहे. वर्षानुवर्षे लोकांची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी आम्ही येथे बसतो, असंही त्यांनी पुढे स्पष्टीकरण दिलं.

…म्हणून महाराष्ट्र शासना मुख्यमंत्रीचा फलक लावला

माझ्या खुर्चीमागे कोणत्यातरी अधिकाऱ्याने अनावधानाने महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री हा फलक ठेवला असेल. मुख्यमंत्र्यांची आज व्हिडीओ कॉन्फरन्स होती. त्यासाठी तो फलक इथे ठेवण्यात आला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची पूर्वतयारी सुरू असल्याने बोर्ड येथे लावण्यात आला असेल. हा फलक मुव्हेबल आहे. तो कुठेही ठेवता येतो. ही घरातील टेम्पररी व्यवस्था आहे, असंही स्पष्टीकरण डॉ.श्रीकांत शिंदे यांनी दिलं.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -