घरपालघरवसई-विरारमधील रिक्षांना वाहतूक शाखेचा ब्रेक आहे का ?

वसई-विरारमधील रिक्षांना वाहतूक शाखेचा ब्रेक आहे का ?

Subscribe

पण, पोलिसांच्या या आदेशाची कुठेही अंमलबजावणी होताना दिसत नाही. विना गणवेश शेकडो रिक्षा रस्त्यावर धावत असल्याने नियमांत राहून व्यवसाय करणार्‍या रिक्षाचालकांना याचा त्रास सहन करवा लागत आहे.

विरारः वसई -विरार शहरातील रिक्षा चालकांना वाहतूक शाखेकडून गणवेश सक्ती करण्यात आली आहे. असे असतानाही शहरात मोठ्या प्रमाणात विना गणवेशधारी शेकडो रिक्षाचालक रिक्षा चालवताना दिसत आहेत. तसेच सध्या शहरात बेकायदेशीर रिक्षांचाही मोठा भरणा असून बेकायदेशीर रिक्षा चालक आपली पोळी भाजत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी होताच शासनाकडून टाळेबंदीचे निर्बंध शिथिल करण्यात आले होते. यामुळे शहरातील रिक्षांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नुकतेच वाहतूक शाखेने रिक्षा चालकांना सुरक्षा कार्ड लावण्याची सक्ती करून गणवेश परिधान करण्याचे आदेश दिले होते. पण, पोलिसांच्या या आदेशाची कुठेही अंमलबजावणी होताना दिसत नाही. विना गणवेश शेकडो रिक्षा रस्त्यावर धावत असल्याने नियमांत राहून व्यवसाय करणार्‍या रिक्षाचालकांना याचा त्रास सहन करवा लागत आहे.

टाळेबंदी शिथिलतेनंतर शहरातील वाढत्या रिक्षा आता नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी कारवाईची भूमिका हाती घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.कोरोना काळात पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाची कारवाई मंदावली होती. यामुळे वसई -विरार शहरात गतवर्षी मोठ्या प्रमाणात वाहतूक वैध्यता संपलेल्या आणि परवाने नसलेल्या रिक्षा दाखल झाल्या आहेत. या रिक्षावरील चालक गणवेश नसलेले किशोर वयीन युवक, चरसी, नशेखोर रात्रीच्यावेळी रिक्षा चालवत असल्याचे आढळून आले आहे.

- Advertisement -

1) अनेक रिक्षा वाहतुकीसाठी योग्य नसतानाही रस्त्यावर धावत आहेत. अनेक रिक्षांना दिवे नाहीत. अनेक रिक्षाचालक गणवेश परिधान करत नाहीत. त्यांच्याकडे लायसन्स नाही. गाडीला कोणतेही कागदपत्रे नाहीत. अनेक गाड्यांवरील नंबर बोगस असावेत असा दाट संशय व्यक्त केला जात आहे.

2)रिक्षा रस्त्यात कुठेही उभे करून रिक्षाचालक प्रवाशी भरतात आणि उतरवतात. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. तसेच ठिकठिकाणी रिक्षा थांबे तयार होऊ लागले आहेत. यातून रस्ते अरुंद होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

- Advertisement -

3) वसई -विरारमध्ये केवळ तीन प्रवाशांची परवानगी असताना रिक्षाचालक चार ते पाच प्रवासी घेवून वाहतूक करत आहेत. शासनाने दिलेल्या नियमांची पायमल्ली होत असल्याने दिसून येत आहे. तर शासनाने दिलेल्या दरावरून प्रवासी आणि मालक यांच्यात वाद पेटून उठला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -