घरताज्या घडामोडीप्रवाशांसाठी खूशखबर! नवरात्रीत रेल्वेने जेवणासाठी सुरू केली खास सुविधा, जाणून घ्या...

प्रवाशांसाठी खूशखबर! नवरात्रीत रेल्वेने जेवणासाठी सुरू केली खास सुविधा, जाणून घ्या…

Subscribe

जर तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करत असाल किंवा तुमच्या रेल्वेची बुकिंग आधीच झाली असेल तर तुमच्यासाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. गणपती उत्सावानंतर नवरात्रीमध्ये रेल्वेने जेवणासाठी खास सुविधा उपलब्ध केली आहे. प्रवाशांसाठी रेल्वेकडून स्पेशल फास्टिंग प्लेट देण्यात येणार आहेत. त्यामुळे ट्रेनमध्ये प्रवास करताना प्रवाशांना फास्ट फूड सहज उपलब्ध होऊ शकतं. याबाबत रेल्वे विभागाने ट्विट करून अधिक माहिती दिली आहे.

रेल्वे विभागाने केलं ट्विट

इंडियन रेल्वेने ट्विटमध्ये म्हटलंय की, नवरात्रीच्या शुभ मुहुर्तावर भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी उपवासाच्या थाळीची खास सुविधा उपलब्ध केली आहे. ही सुविधा 26.09.22 ते 05.10.22 पर्यंत तुम्हाला ट्रेनमध्ये मिळणार आहे.

- Advertisement -

तुम्ही कॉल करून देखील ऑर्डर करू शकता

ही सुविधा IRCTC च्या वतीने सुमारे 400 स्थानकांवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. या प्लेटच्या सोयीसाठी, प्रवासी 1323 वर कॉल करू शकतात. या नंबरवर कॉल करून तुम्ही तुमची डिनर प्लेट बुक करू शकता. बुकिंग केल्यानंतर उपवासाची थाळी तुम्हाला उपलब्ध होईल.

- Advertisement -

ऑर्डर कशी द्याल?

ट्रेनमध्ये प्रवास करताना तुम्ही ‘Food on Track’ अॅपवरून नवरात्री स्पेशल थाळी ऑर्डर करू शकता किंवा तुम्ही रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट http://ecatering.irctc.co.in वरूनही ऑर्डर करू शकता.


हेही वाचा : गरबा खेळण्यासाठी फक्त हिंदूंना परवानगी द्या, विश्व हिंदू परिषदेची मागणी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -