घरलाईफस्टाईलवचेला मुलायम राखण्यासाठी काही नॅचरल टिप्स , हिवाळ्यात आंघोळ करताना

वचेला मुलायम राखण्यासाठी काही नॅचरल टिप्स , हिवाळ्यात आंघोळ करताना

Subscribe

थंडीतही त्वचा उजळ आणि सुंदर असावी यासाठी खर्चिक रासायनिक मॉयश्चरायझर वापरण्यापेक्षा काही नैसर्गिक पर्यायही उपलब्ध आहेत. बोचर्या थंडीत त्वचेला मुलायम राखण्यासाठी काही नॅचरल टिप्स..

कोरफड-
बहुगुणी कोरफड त्वचा कोरडी पडली असल्यास कोरफडीचा गर किंवा रस त्वचा मुलायम आणि तजेलदार राखण्यासाठी उपयोगी ठरतो.

- Advertisement -

गुलाबपाणी-
गुलाब पाण्याचा त्वचेवर वापर केल्याने चेहऱयावरील ब्लॅकहेड्स, तेलकटपणा निघून जाण्यास मदत होते.

मध
त्वचेचा मखमलीपणा कायम राखण्यासाठी मधाचा उपयोग होतो. त्याचबरोबर चेहऱयावरील पुरळ घालविण्यासाठीही मधाचा उपयोग केला जातो.

- Advertisement -

ऑलिव्ह ऑईल-
थंडीमुळे रखरखीत झालेल्या त्वचेला मुलायम बनविण्यासाठी ऑलिव्ह ऑईलचा उपयोग केला जातो. परंतु, या ऑईलचा उपयोगही योग्य प्रमाणात करायला हवा. बाजारात सध्या ऑलिव्ह ऑईलचेही विविध प्रकार उपलब्ध आहेत.

हिवाळ्यात आंघोळ करताना

हिवाळ्यात आंघोळ केल्यानंतरही त्वचेचा कोरडेपणा जात नाही. या दिवसात वातावरणात त्वचा अधिक कोरडी पडते. म्हणूनच हिवाळ्यात आंघोळ करताना त्वचेची विशेष काळजी घ्यावी.

*हिवाळ्यात आंघोळीसाठी दुधात सुगंधी उटणे भिजवून त्याचा वापर करावा.

*या दिवसांत शक्यतो साबणाचा वापर टाळावा, शक्य झाल्यास ग्लिसरीनयुक्त साबणाचा वापर केला तर चालेल. त्यामुळे त्वचा मऊ राहते.

*आंघोळीनंतर संपूर्ण अंगाला ग्लिसरीन किंवा मॉईश्चरायझर लावावे, पण हे लावल्यानंतर टाल्कम पावडर लावण्याचे टाळावे.

*हिवाळ्यात सर्वांत जास्त काळजी पायांची घ्यावी लागते. कारण या दिवसांत पायांना भेगा पडतात.

*भेगा कमी करण्यासाठी आंघोळ झाल्यानंतर लगेचच तळपाय प्युमिक स्टोन किंवा वझरीने रगडून घासावे.

*पाय वाळण्यापूर्वीच त्यावर कोल्ड क्रीम किंवा मॉईश्चरायझर लावावे. पाय जास्त कोरडे पडू नये म्हणून हिवाळ्यात मोज्यांचा वापर करावा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -