घरमुंबईजनसंपर्क कार्यालयावरून शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये जुंपली, अंधेरीत SRPF आणि पोलीस तैनात

जनसंपर्क कार्यालयावरून शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये जुंपली, अंधेरीत SRPF आणि पोलीस तैनात

Subscribe

जनसंपर्क कार्यालयासाठी भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांना अंबिक टॉवरमधील तळमजल्यावरील जनसंपर्क कार्यालय भाड्याने घेतले आहे. तर, तेच कार्यालय शिवसेनेलाही दुसऱ्या एजंटमार्फत देण्यात आलंय. त्यामुळे या एका जनसंपर्क कार्यालयावरून दोन्ही गटात जुंपली. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वाद मिटला. 

मुंबई – अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील आमदार रमेश लटके (Ramesh Latake) यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक (Bypoll in Andheri) जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंकडून (Uddhav Thackeray) रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latake) यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर, भाजपतर्फे मुरजी पटेल हे संभाव्य उमेदवार आहेत. तसंच, शिंदे गटाकडूनही उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. अशा वातावरणातच या मतदारसंघातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. अंधेरी येथील पंप हाऊसजवळ अंबिका टॉवरमध्ये जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यावरून शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांत राडा झाला. यावेळी येथे काही काळ तणावाचं वातावरण होतं. मात्र, राज्य राखीव पोलीस दल आणि एमआयडीसी पोलिसांना येथे तैनात करण्यात आल्याने प्रकरण शांत झालं आहे.

हेही वाचा – अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार रमेश लटके यांचं निधन

- Advertisement -

जनसंपर्क कार्यालयासाठी भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांना अंबिक टॉवरमधील तळमजल्यावरील जनसंपर्क कार्यालय भाड्याने घेतले आहे. तर, तेच कार्यालय शिवसेनेलाही दुसऱ्या एजंटमार्फत देण्यात आलंय. त्यामुळे या एका जनसंपर्क कार्यालयावरून दोन्ही गटात जुंपली. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वाद मिटला.

रमेश लटके यांचं निधन झाल्याने अंधेरी पूर्व येथे पटोनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे शिवसेनेकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर, शिंदे गटाकडूनही येथे कटशाह करण्यासाठी उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल हेसुद्धा संभाव्य उमेदवार असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे आता इथे तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा – उद्धव ठाकरेंकडून खेळी! अंधेरी पूर्वेत विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सेनेकडून उमेदवारी जाहीर

कोण आहेत रमेश लटके?

आमदार रमेश लटके कुटुंबियांसह दुबईला गेले होते. तिथेच त्यांना १२ मे रोजी  हृदयविकाराचा तीव्र झटका आला. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते. सलग दोन टर्म रमेश लटके हे शिवसेनेचे आमदार राहिले आहेत. भाजपचे उमेदवार सुनील यादव यांचा पराभव करून शिवसेनेचे उमेदवार रमेश लटके हे 2014 मध्ये अंधेरी पूर्वमधून महाराष्ट्र विधानसभेवर पहिल्यांदा निवडून आले. यावेळी काँग्रेसचे उमेदवार सुरेश शेट्टी हे तिसऱ्या स्थानावर होते. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार एम. पटेल यांचा पराभव केला. त्यावेळी लटके हे 16 हजार 965 मतांनी विजयी झाले होते.

1997 मध्ये मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून लटके हे निवडून गेले. त्यानंतरच्या सन 2002 आणि 2009च्या महापालिका निवडणुकीत विजयी झाले आणि महापालिकेत नगरसेवक म्हणून गेले. तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना बढती मिळाली आणि ते विधानसभेचे आमदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर पुढच्याच 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत अंधेरी पूर्वच्या मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा निवडून दिले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -