घरक्रीडाटी-20 विश्वचषकाचे अंतिम विजेते होणार मालामाल; स्पर्धेत एकूण 45.66 कोटींचे बक्षीस

टी-20 विश्वचषकाचे अंतिम विजेते होणार मालामाल; स्पर्धेत एकूण 45.66 कोटींचे बक्षीस

Subscribe

येत्या 16 ऑक्टोबरपासून आयसीसी टी-20 विश्वचषकाला सुरूवात होणार आहे. या विश्वचषकात एकूण 16 संघ आपला खेळ दाखवणार आहेत. जवळपास महिनाभर रंगणाऱ्या या स्पर्धेची बक्षीस जाहीर करण्यात आली आहेत. त्यानुसार, अंतिम संघ चांगलेच मालामाल होणार आहेत.

येत्या 16 ऑक्टोबरपासून आयसीसी टी-20 विश्वचषकाला सुरूवात होणार आहे. या विश्वचषकात एकूण 16 संघ आपला खेळ दाखवणार आहेत. जवळपास महिनाभर रंगणाऱ्या या स्पर्धेची बक्षीस जाहीर करण्यात आली आहेत. त्यानुसार, अंतिम संघ चांगलेच मालामाल होणार आहेत. या स्पर्धेत एकूण 5.6 दशलक्ष बक्षीस रक्कम ठेवण्यात आली आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम सुमारे 45.66 कोटी इतकी आहे. (ICC Mens T20 World Cup 2022 prize pot announced)

आयसीसीने या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी बक्षीस रक्कमेची यादी जाहीर केली आहे. या टी-20 विश्वचषकाच्या स्पर्धेतील विजेत्या संघाला 1.6 मिलियन मिळणार आहेत. म्हणजेच, जवळपास 13 कोटी रुपये मिळणार आहेत. तसेच, रनरअप म्हणजेच उपविजेत्या संघाला सुमारे 6.5 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.

- Advertisement -

या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत होणाऱ्या संघासाठी 4 लाख यूएस डॉलर दिले जाणार आहेत. तर, सुपर 12 मधून बाहेर पडलेल्या 8 संघांमधील प्रत्येक संघाला 7 हजार अमेरिकन डॉलर्स मिळणार आहेत.

टी-20 विश्वचषकातील बक्षीसांची यादी

- Advertisement -

संघ                                                              बक्षीस                          भारतीय चलनानुसार

विजेता                                                     1.6 मिलियन डॉलर               जवळपास 13 कोटी
उप-विजेता                                                0.8 मिलियन डॉलर               जवळपास 6.5 कोटी
सेमीफायनलमध्ये पराभूत झालेला संघ                0.4 मिलियन डॉलर               जवळपास 3.26 कोटी
सुपर-12 मध्ये प्रत्येक सामना जिंकणारा संघ        40 हजार डॉलर                    जवळपास 33.62 लाख
सुपर-12 मधून बाहेर पडणारा प्रत्येक संघ           70 हजार डॉलर                    जवळपास 57.09 लाख
पहिल्या फेरीत प्रत्येक सामना जिंकणारा संघ        40 हजार डॉलर                    जवळपास 33.62 लाख
पहिल्या फेरीतून बाहेर पडलेला संघ                   40 हजार डॉलर                    जवळपास 33.62 लाख


हेही वाचा – भारताच्या सूर्यकुमार यादवची तुफानी फलंदाजी; ‘या’ खेळाडूला टाकले मागे

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -