घरCORONA UPDATEदेशामध्ये गेल्या 24 तासांत 3,805 नवे कोरोनाबाधित, रुग्ण बरे होण्याचा दर 98.73...

देशामध्ये गेल्या 24 तासांत 3,805 नवे कोरोनाबाधित, रुग्ण बरे होण्याचा दर 98.73 टक्के

Subscribe

नवी दिल्ली : देशामध्ये गेल्या 24 तासांत 3 हजार 805 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.29 टक्के इतका आहे. तर, या 24 तासांत 5 हजार 69 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

भारतातील कोविड-सक्रीय रुग्णांची संख्या सध्या 38 हजार 293 इतकी असून ही आकडेवारी एकूण रुग्णसंख्येच्या 0.09 टक्का आहे. गेल्या 24 तासांमध्ये 5 हजार 69 रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. त्यानुसार एकूण कोविडमुक्त झालेल्यांची संख्या 4 कोटी 40 लाख 24 हजार 164 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 98.73 टक्के इतका आहे.

- Advertisement -

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.29 टक्के इतका असून साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.39 टक्के इतका आहे. आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 89 कोटी 53 लाख चाचण्या करण्यात आल्या आहेत; गेल्या 24 तासांत 2 लाख 95 हजार 416 चाचण्या करण्यात आल्या.

आतापर्यंत 218 कोटी लसीकरण
देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाला 16 जानेवारी 2021पासून सुरूवात झाली. तर, 21 जून 2021 पासून या लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाचा टप्पा सुरू झाला. कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 218 कोटी 68 (94.86 कोटी दुसरी मात्रा आणि 21.33 कोटी वर्धक मात्रा) लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत 16 लाख 29 हजार 137 मात्रा देण्यात आल्या.

- Advertisement -

कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाच्या नवीन टप्प्यात, केंद्र सरकार देशातील लस उत्पादकांद्वारे उत्पादित 75 टक्के लस खरेदी करून या लसींचा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना (विनामूल्य) पुरवठा करत आहे. केंद्र सरकारने सुमारे 203.45 (2,03,45,65,325) कोटी लसींच्या मात्रा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना (मोफत) आणि थेट राज्याद्वारे खरेदी प्रक्रियेच्या अर्थात सर्व स्रोतांच्या माध्यमातून उपलब्ध केल्या आहेत.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 4 कोटी 10 लाखांपेक्षा (4,10,30,931) जास्त किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वाढवणारी वर्धित लसमात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -