घरमहाराष्ट्रअश्लील फोटोचा धाक दाखवत तरुणीवर बलात्कार

अश्लील फोटोचा धाक दाखवत तरुणीवर बलात्कार

Subscribe

पिपंरी-चिंचवड येथील एका इसमाने एका ओळखीच्या तरुणीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देऊन तिला लाखो रुपयांनी गंडवले आहे. त्याचबरोबर त्या इसमाने तरुणीवर बलात्कारही केला आहे.

पिपंरी-चिंचवड येथील एका इसमाने एका ओळखीच्या तरुणीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देऊन तिला लाखो रुपयांनी गंडवले आहे. त्याचबरोबर त्या इसमाने तरुणीवर बलात्कारही केला आहे. या इसमाने पीडित तरुणीच्या राहत्या घराचा अर्धा हिस्सा बळकावला आहे. पीडित तरुणी ही गेल्या काही वर्षांपासून हिंजवडीमधील आयटी कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करत आहे. ही घटना पिंपळे सौदागर येथील उच्चभ्रू सोसायटीमध्ये घडली आहे. याप्रकरणी २९ वर्षीय पीडित तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपीला त्याच्या पत्नीने साथ दिल्याने तिच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडितीवर अत्याचार करणाऱ्या दाम्पत्यांचे नाव शिबु सिद्दीकी आणि रक्षी शिबु सिद्दीकी असे आहे. ते अलाहाबादच्या गोविंदपूरचे रहिवाशी आहेत.

हेही वाचा – झोपेतच मुलीचे केले अपहरण; कारमध्ये केला सामुहिक बलात्कार

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी हा पीडित तरुणीच्या ओळखीचा आहे. ते गेल्या आठ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. याचाच गैरफायदा घेत २९ शिबुने पीडितीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले. ते सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत शिबुने तरुणीचा बलात्कार केला. तसेच लाखो रुपये हे बँक खात्यात जमा करून घेतले.यात आरोपीच्या पत्नीनेही गुन्ह्यासाठी मदत केल्याप्रकरणी तिच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा एवढ्यावरच थांबला नाही तर पिंपळे सौदागर येथील उच्चभ्रू सोसायटीमधील पीडितीच्या फ्लॅटचा अर्धा हिस्सा बक्षिस पत्राद्वारे नावावर करून घेतला. पीडितेने याबाबतस बाहेर वाच्यता केल्यास तिला जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पती-पत्नी दाम्पत्याला अटक केलेले नाही. या घटनेचा तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका सरग या करीत आहेत.


हेही वाचा – हत्या करुन महिलेच्या मृतदेहावर केला बलात्कार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -