घरक्रीडालेटमार्क ठरलं शिमरॉन हेटमायरच्या वेस्ट इंडिया संघातून बाहेर जाण्याचे कारण; वाचा नेमकं...

लेटमार्क ठरलं शिमरॉन हेटमायरच्या वेस्ट इंडिया संघातून बाहेर जाण्याचे कारण; वाचा नेमकं काय घडलं?

Subscribe

आगामी टी-20 विश्वचषकाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. विश्वचषकावर आपले नाव कोरण्यासाठी सर्व संघाचे खेळाडू जोरदार सराव करत आहेत. मात्र, यंदा विश्वचषकापूर्वी संघांना दुखापतीचे ग्रहण लागले आहे. अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर गेले आहेत.

आगामी टी-20 विश्वचषकाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. विश्वचषकावर आपले नाव कोरण्यासाठी सर्व संघाचे खेळाडू जोरदार सराव करत आहेत. मात्र, यंदा विश्वचषकापूर्वी संघांना दुखापतीचे ग्रहण लागले आहे. अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर गेले आहेत. परंतू, वेस्ट इंडिजचा फलंदाज शिमरॉन हेटमायर टी-20 विश्वचषकातून बाहेर झाला आहे. हेटमायरचे बाहेर जाण्यामागचे कारण दुखापत नसून लेटमार्क ठरलं आहे. (after missing rescheduled flight to Australia shimron hetmyer dropped from west indies quad for the t20 world cup)

वेस्ट इंडिजच्या संघाचा स्टार फलंदाज शिमरॉन हेटमायर टी-20 विश्वचषकातून बाहेर झाला आहे. त्याला दुखापत झाली नाही. पण फ्लाइट मिस झाल्यामुळे बोर्डाने कठोर निर्णय घेत त्याला टी-20 वर्ल्ड कप संघातून वगळण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी वेस्ट इंडिजच्या संघात शिमरॉन हेटमायरच्या जागी फलंदाज शमर ब्रूक्सला स्थान देण्यात आले आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने सोमवारी यासंदर्भातील घोषणा केली.

“सीडब्ल्यूआय निवड समितीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. हेटमायरने ऑस्ट्रेलियासाठी आपलं रिशेड्युल केलेलं विमान चुकवलं. काही कारणास्तव त्याने वेळ बदलली होती”, असे क्रिकेट बोर्डाने म्हटले.
तसेच, क्रिकेट बोर्डानेही सर्वांच्या संमतीने टी-20 विश्वचषक स्पर्धेत हेटमायरच्या जागी शमरह ब्रुक्र याची निवड करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

ऑस्ट्रेलियात खेळला जाणाऱ्या 8व्या टी-20 विश्वचषकाच्या गट टप्प्यातील सामन्यांना 16 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर 22 ऑक्टोबरपासून सुपर 12 सामने खेळले जाणार असून, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे.


हेही वाचा – कोल्हापुरात कुस्तीच्या सरावावेळी 23 वर्षीय पेहलवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -