घरभक्तीलक्ष्मीपूजन करताना देवी लक्ष्मीची कशा प्रकारची मूर्ती वापरावी? जाणून घ्या शास्त्र

लक्ष्मीपूजन करताना देवी लक्ष्मीची कशा प्रकारची मूर्ती वापरावी? जाणून घ्या शास्त्र

Subscribe

हिंदू धर्मात सर्व सण-समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. दसरा झाला की सगळ्यांचे लक्ष दिवाळीकडे असते. दिवाळी भारतीयांचा सर्वात आवडता सण समजला जातो. या वर्षी नरक चतुदर्शी आणि दिवाळी म्हणजेच लक्ष्मीपूजन एकाच दिवशी असणार आहे. प्रत्येक वर्षी दिवाळीच्या दोन दिवस आधी धनत्रयोदशी साजरी केली जाते, तर दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी साजरी केली जाते आणि तिसऱ्या दिवशी दिवाळी मात्र यंदा नरक चतुदर्शी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी असणार आहे. त्यामुळे या दिवशी विशेष योग असणार आहेत.

पौराणिक परंपरेनुसार, दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि श्री गणेशांची पूजा केली जाते. असं म्हणतात की, दिवाळीच्याच दिवशी श्रीराम 14 वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येला परत आले होते. त्यामुळे अयोध्येतल्या नागरिकांनी आनंद साजरा केला होतो. मात्र या दिवशी अश्विन अमावस्या असल्याने रात्री सगळीकडे अंधार होता. त्यामुळे अयोध्येतल्या लोकांनी मातीचे दिवे लावून सर्व अयोध्या प्रकाशमय करत श्रीरामांचे स्वागत केले. तेव्हापासून हा सण प्रत्येक वर्षी साजरा केला जातो. अनेकजण लक्ष्मीपूजन करण्यासाठी बाजारातून देवी लक्ष्मीचा नवीन फोटो किंवा मूर्ती घेऊन येतात. मात्र, फोटो घेताना विशेष लक्ष द्यादला हवे.

- Advertisement -

  • ज्योतिष शास्त्रानुसार, दिवाळीला देवी लक्ष्मीची मूर्ती खरेदी करताना लक्षात घ्या की, देवीची मूर्ती आर्शिवाद देणारी असावी. अशा मूर्ती किंवा फोटोमुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
  • वास्तू नुसार, घरामध्ये भगवान विष्णूंसोबत देवी लक्ष्मीचा फोटोचे पूजन करणं देखील शुभ मानलं जातं.
  • वास्तूनुसार, देवी लक्ष्मीच्या फोटोमध्ये हत्तींचे चित्र असण देखील शुभ मानलं जातं.
  • तसेच फोटोमध्ये देवी लक्ष्मींसोबत त्यांचे वाहन घूबड असणं देखील शुभ मानलं जातं.

अशा प्रकारचा फोटो कधीही ठेवू नका
घरामध्ये कधीही देवी लक्ष्मीची उभी मूर्ती किंवा फोटो ठेवू नये. यामुळे घरामध्ये अस्थिर लक्ष्मीचा वास होतो. यामुळे घरामध्ये आर्थिक परिस्थिती देखील निर्माण होते.

- Advertisement -

हेही वाचा :

दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा ‘हे’ उपाय; चमकेल तुमचे भाग्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -