घरमहाराष्ट्र...तर मीसुद्धा उसतोड कामगार होईन, चौथीच्या विद्यार्थ्याचे मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र

…तर मीसुद्धा उसतोड कामगार होईन, चौथीच्या विद्यार्थ्याचे मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र

Subscribe

बीड –मी सुद्धा मोठा ऊसतोड कामगार म्हणून ओळखला जाईन. म्हणून तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे की माझी शाळा बंद करु नका, असं भावनिक पत्र एका विद्यार्थ्यांने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलं आहे. २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्ह परिषदेच्या शाळा बंद करण्याचा फतवा निघाल्याने विद्यार्थ्याने हे पत्र लिहिलं आहे. या पत्राची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दखल घेतात का हे पाहावं लागेल.

२० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या गावात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं शिक्षण धोक्यात आलं आहे. अनेक गावात गावापासून लांब कोसोदूर शाळा असल्याने प्राथमिक शाळेतील विद्यार्थी शाळेत जाऊ शकणार नाहीत. राज्यातील विविध जिल्ह्यात हिच स्थिती आहे. त्यामुळे संभाव्य परिस्थिती लक्षात घेत चौथीत शिकणाऱ्या समाधान बाबासाहेब जायभाये या विद्यार्थ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित शाळा बंद न करण्याची विनंती केली आहे.

- Advertisement -

बीडमधील जायभायवाडी या डोंगरगावात समाधान राहतो. तिथे इयत्ता चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. मात्र, ही शाळा बंद झाल्यास पाच ते सात किमी लांब असलेल्या शाळेत पायपीट करून जावी लागणार आहे. ही पायपीट सहन न झाल्यास शाळा सोडावी लागेल आणि आमच्या आई-वडिलांप्रमाणेच आम्हालाही उसतोड कामगार व्हावं लागेल, अशी भिती या विद्यार्थ्याने पत्राद्वारे व्यक्त केली आहे.

काय लिहिलंय पत्रात?

समाधान बाबासाहेब जायभाये 
वर्ग 4 था
जि. प. प्रा. शा. जायभायवाडी ता धारुर. जी बीड.

- Advertisement -

प्रती
मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र 

पत्र लिहिण्यास कारण की, आमचे सर म्हणाले की आमची शाळा बंद होणार आहे. जर माझी शाळा बंद झाली तर माझं काय होईल, माझे आई-वडील ऊसतोड कामगार आहेत जर माझी शाळा बंद झाली तर मला सुद्धा ऊस तोडायला जावे लागेल. आणि मी सुद्धा मोठा ऊसतोड कामगार म्हणून ओळखला जाईन. म्हणून तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे की माझी शाळा बंद करु नका. जर माझी शाळा बंद झाली तर आम्हाला दुसऱ्या गावाला शिकायला जावे लागते. जाताना वाटेत आहे ओढे आहेत आणि त्या ओढ्यात छातीपर्यंत पाणी आहे आम्हाला त्याच पाण्यातून जावे लागेल. आम्ही पहिली दुसरीची मुले अज्ञात मुलं आम्ही कसे जायचे म्हणून माझी तुम्हाला कळकळीची नम्र विनंती आहे की माझी बंद करु नका. माझं गाव डोंगराच्या कुशीत बसलेलं आहे

नाव. समाधान बाबासात जायभाये.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -