घरताज्या घडामोडीनवाब मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ

नवाब मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ

Subscribe

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी झाली.

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावेळी न्यायालयाने मलिकांना दिलासा मिळाला नाही. (Extension Of Judicial Custody By 14 Days In Ncp Leader Nawab Malik)

नवाब मलिकांना 2 नोव्हेंबरपर्यत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नवाब मलिक मागील काही दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. नवाब मलिक हे सध्या कुर्ला येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत.

- Advertisement -

नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालयाने फेब्रुवारीमध्ये अटक केली होती. दाऊद इब्राहिमशीसंबंधित मालमत्ता खरेदी करताना आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ईडीच्या पथकाने 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता त्यांच्या घरावर छापा टाकला होता. यानंतर ईडीने नवाब मलिकांना ताब्यात घेत चौकशीसाठी कार्यालयात आणलं होतं. याठिकाणी सुमारे 6 तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.

- Advertisement -

हेही वाचा – अलिबागमधील आरसीएफ कंपनीत भीषण स्फोट, 3 ठार तर 4 गंभीर जखमी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -